शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याच्या दोन नगरसेवकांना भामट्याने घातला हजारोंचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:44 IST

ठाणे : प्रभागातील एखाद्या गोरगरीब रहिवाशाच्या नावाने नगरसेवकांशी संपर्क साधून वैद्यकीय मदतीच्या नावाखाली ठाणे महापालिकेच्या दोन नगरसेवकांना ...

ठाणे : प्रभागातील एखाद्या गोरगरीब रहिवाशाच्या नावाने नगरसेवकांशी संपर्क साधून वैद्यकीय मदतीच्या नावाखाली ठाणे महापालिकेच्या दोन नगरसेवकांना भामट्यांनी हजारो रुपयांनी गंडा घातल्याची धक्कादायक माहिती बुधवारी महानगरपालिकेच्या महासभेत उघडकीस आली. कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एमआरआय करण्यासाठी डॉक्टरने एक हजार रुपये कमी केले आहेत. उर्वरित रक्कम ‘गुगल पे’ने अदा करावी, अशी बतावणी करून एका भामट्याने नगरसेवकांना फसवले. विशेष म्हणजे ज्या नगरसेवकांना हा गंडा घातला गेला, त्यांनीच ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. लोकांना गंडविणारी अशाप्रकारची टोळीच सक्रिय असल्याचा आरोप भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी केला असून, या प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय यावेळी सभागृहात घेण्यात आला.

शिवसेनेचे नगरसेवक एकनाथ भोईर यांनी सभागृहास दिलेल्या माहितीनुुसार, ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील एमआरआय सेंटरमध्ये आपल्या तीन वर्षांच्या मुलीच्या एमआरआयसाठी पैसे कमी पडत असल्याचा फोन आपल्याला आला होता. ज्या व्यक्तीने फोन केला, त्या व्यक्तीकडे केवळ अडीच हजार रुपये होते. मी तुमच्या प्रभागाचा रहिवासी आहे, असे त्याने भोईर यांना सांगितले. एमआरआयसाठी सहा हजार रुपयांची गरज आहे, असे त्याचे म्हणणे होते. त्यानंतर आपण स्वत: रुग्णालयाच्या डीनशी बोलून पैसे कमी करण्याची विनंती केली. मात्र, डीन यांनी त्यांच्या केबिनमध्येही या रहिवाशास येऊ दिले नाही, असे भोईर यांनी सांगितले.

अशाच प्रकारे एमआरआयसाठी पैसे कमी पडत असल्याचा फोन आपल्यालादेखील आला असून, याद्वारे आपलीही फसवणूक झाल्याची माहिती शिवसेनेचे नगरसेवक गुरूमुखसिंग स्यांन यांनी दिल्यानंतर सभागृह अवाक् झाले. शिवसेनेचे नगरसेवक सुधीर कोकाटे यांनादेखील अशाच प्रकारे फोन आल्याचे त्यांनी सभागृहास सांगितले. मात्र, आपण त्यात फसलो नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी अशा प्रकारची टोळीच सक्रिय असल्याचे सभागृहात सांगितले. प्राथमिक स्वरूपात पालिकेच्या या दोन नगरसेवकांची फसवणूक झाली असली तरी, इतरही नगरसेवकांची फसवणूक झाली असल्याची शक्यता असल्याने या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन गुन्हे दाखल करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.

अशा पद्धतीने केली पैशांची लूट

ज्या व्यक्तीने पैसे मागण्यासाठी भोईर यांना फोन केला होता, तिने आपण आपल्याच प्रभागाचे रहिवासी असल्याचे भोईर यांना सांगितले. कळवा हॉस्पिटलमध्ये एमआरआय करणाऱ्या डॉक्टरचे नाव एकनाथ शिंदे असून ते फक्त एक हजार रुपये कमी करत असल्याचे भोईर यांना त्याने सांगितले. उर्वरित पैशांची आपल्याकडे व्यवस्था नसून, त्याने भाेईर यांना मदत करण्याची विनवणी केली. विशेष म्हणजे नगरसेवक गुरूमुखसिंग स्यांन यांनी या सर्व प्रकारचा शोध लावल्यानंतर फसवणारी व्यक्ती नाशिकची असल्याचे उघड झाले आहे.