शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे कारागृहात कैद्यांचे कला‘चिंतन’! एकाहून एक सरस चित्र, चिंतन उपाध्याय या आंतरराष्ट्रीय कलाकाराचे मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 06:05 IST

एकेकाळी गंभीर गुन्ह्यांनी बरबटलेले ठाणे कारागृहातील कैद्यांचे हात आता कुंचल्यांवर फिरू लागले आहेत. चिंतन उपाध्याय यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकाराच्या सहवासात या कैद्यांनी एकापेक्षा एक सरस कलाकृती चितारल्या आहेत.

- राजू ओढे ठाणे : एकेकाळी गंभीर गुन्ह्यांनी बरबटलेले ठाणे कारागृहातील कैद्यांचे हात आता कुंचल्यांवर फिरू लागले आहेत. चिंतन उपाध्याय यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकाराच्या सहवासात या कैद्यांनी एकापेक्षा एक सरस कलाकृती चितारल्या आहेत.पत्नी आणि तिच्या वकिलाचा खून केल्याच्या आरोपाखाली प्रख्यात चित्रकार चिंतन उपाध्याय यांना दोन वर्षांपूर्वी अटक करण्यात आली होती. ते सध्या ठाणे कारागृहात आहेत. कारागृहातील त्यांच्या सहवासातून इतर कैद्यांमध्ये दडलेल्या कलाकारास चालना मिळावी, कारागृहाच्या रूक्ष दिनचर्येतून कैद्यांना दोन क्षण आनंदाचे घालवता यावे, यादृष्टीने जिल्हा मध्यवर्ती कारागृहाचे तुरुंग अधीक्षक नितीन वायचळ यांनी अभिनव उपक्रम सुरू केला. त्यानुसार, चित्रकला शिकू इच्छिणाºया कैद्यांना आॅगस्ट महिन्यात चिंतन उपाध्याय यांच्या मदतीने प्राथमिक प्रशिक्षण देण्यात आले. कारागृहातील ९ कैद्यांनी या कलेमध्ये रुची दाखवली. त्यांना पेन्सील किंवा स्केच पेनने चित्रे रंगवण्याची आवड होती. ब्रशने चित्र रंगवण्याची त्यांची ही पहिलीच वेळ होती. उपाध्याय यांनी कैद्यांना काल्पनिक चित्रे रंगवण्यास सांगितले.कारागृहाचे रूक्ष जीवन आणि आप्तेष्टांचा विरह सहन करणाºया या कैद्यांनी अतिशय आकर्षक कलाकृती चितारल्या. बहुतेक कैद्यांच्या कलाकृतींमध्ये त्यांच्या रूक्ष जीवनाचे प्रतिबिंब उमटले. कैद्यांनी केलेल्या १० ते १२ कलाकृती कारागृहामध्ये तयार आहेत. या कलाकृतींची प्रदर्शनी कारागृह परिसरात लवकरच आयोजित केली जाणार असल्याची माहिती नितीन वायचळ यांनी दिली. राज्यातील इतर कारागृहांमध्येही अशाच प्रकारचे काही उपक्रम राबवण्यात आले होते. या सर्व कलाकृतींची एकत्रित प्रदर्शनी कमलनयन बजाज आर्ट गॅलरीमध्ये आयोजित करण्यासाठीही प्रयत्न केले जातील, असे वायचळ यांनी सांगितले.कारागृहात कैद्यांची दिनचर्या ठरलेली असते. पश्चात्तापाची भावना त्यांच्या मनात घर करून असते. समाजाचा रोष आणि आप्तेष्टांचा विरह सहन करून त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. या परिस्थितीतून काही क्षण का होईना कैद्यांना बाहेर पडता यावे, या एकमेव उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला होता. सुदैवाने चिंतन उपाध्याय यांच्यासारख्या ख्यातनाम कलाकाराची साथ लाभली आणि हा उपक्रम यशस्वी होऊ शकला.- नितीन वायचळ,- तुरुंग अधीक्षक,जिल्हा मध्यवर्ती कारागृह, ठाणे