शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

पुस्तके कमी झाली असली तरी वाचन कमी झालेले नाही- सदानंद मोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 01:05 IST

मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या ‘श्रीस्थानक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार’ व ‘अ‍ॅड. वा.अ. रेगे साहित्य पुरस्कार’ सोहळा शनिवारी पुस्तक आदानप्रदान महोत्सवाच्या शेवटच्या सत्रात पार पडला.

ठाणे : ग्रंथव्यवहाराला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली पाहिजे. वाचनाचे प्रमाण कमी होतेय, असे म्हटले जाते; मग पुस्तकांचे प्रमाण कमी होतेय का? डिजिटल स्वरूपातील पुस्तकेही वाचली जाऊ शकतात. पुस्तके कमी झाली, असे म्हणत असलो तरी वाचन कमी झाले, असे म्हणता येणार नाही. कारण, वाचक हे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये वाचू लागले आहेत, असे मत ज्येष्ठ साहित्यिक, संशोधक व महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.

मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या ‘श्रीस्थानक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार’ व ‘अ‍ॅड. वा.अ. रेगे साहित्य पुरस्कार’ सोहळा शनिवारी पुस्तक आदानप्रदान महोत्सवाच्या शेवटच्या सत्रात पार पडला. यावेळी डॉ. मोरे म्हणाले की, ग्रंथालयांचे महत्त्व वाढले आहे. ग्रंथालयात ग्रंथ वाचून ते परत दिले जातात आणि गॅझेटवर वाचतात म्हणजे हा ग्रंथव्यवहाराचा विस्तार आहे. पुस्तके हातात घेऊन वाचण्याचा वेगळाच आनंद असतो. तरुण पिढीला जुन्या पिढीने पुस्तक हातात घेऊन वाचा, असे सांगितले पाहिजे. पुस्तकांचे महत्त्व तरुण पिढीला कळण्यासाठी त्यांना इतिहासाची गोडी लावावी. आधुनिक पिढीवर टीका करताना त्यांचे प्रश्न सहानुभूतीपूर्वक समजून घ्यावे. तरुण पिढीला पुस्तकांचे महत्त्व कळण्यासाठी पुस्तकांना पुरस्कार देणे महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले.

ग्रंथांना पुरस्कृत करण्याचे धोरण मराठी ग्रंथसंग्रहालयाने स्वीकारले आहे. अ‍ॅड. वा.अ. रेगे साहित्य पुरस्कार हा महाराष्ट्रातला महत्त्वाचा पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार ग्रंथसंग्रहालयाच्या वतीने दिला जातो, त्याला वेगळे महत्त्व आहे. सामान्य माणसाला चांगल्या पुस्तकाची निवड करता येईलच, असे नाही. पुरस्कारांमुळे त्यांना चांगले पुस्तक निवडून ते वाचण्याची संधी मिळते, असे मत डॉ. मोरे यांनीमांडले.

अनुवादित पुस्तकांबद्दल आपले मत मांडताना डॉ. वसुधा सहस्रबुद्धे म्हणाल्या की, अनुवाद करताना अनुवाद करणाºया लेखकाला परकाया प्रवेश करावा लागतो. दुसºया प्रांतांतील, भाषांतील माणसे, त्यांची नाती, संस्कृती समजून घ्यायला लागते. आपल्या भाषेसाठी त्यांना जोडावे लागते. तेव्हा ती पुस्तके पुरस्कारासाठी समोर येतात. हौस म्हणून अनुवाद करता येत नाही. त्यासाठी परिश्रम घ्यावे लागतात, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.