शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूरच्या कोंडेश्वर धबधब्याला आता काटेरी कुंपण

By admin | Updated: July 19, 2016 03:01 IST

बदलापूरच्या कोंडेश्वर धबधब्यावर भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची शनिवारी आणि रविवारी मोठ्या संख्येने गर्दी होते.

बदलापूर : बदलापूरच्या कोंडेश्वर धबधब्यावर भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची शनिवारी आणि रविवारी मोठ्या संख्येने गर्दी होते. मात्र त्यातील काही पर्यटक धबधब्यावरुन थेट कुंडात उड्या मारत असल्याने त्यातून जीव जाण्याच्या घटना वाढत आहेत. अशा पर्यटकांना आवर घालण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने धबधब्याच्या वरील बाजुला काटेरी तारांचे कुंपण घातले आहे. तसेच ज्या ठिकाणावरुन पर्यटक कुंडात उड्या मारतात तेथेही काटेरी तार लावण्यात आली आहे. या उपाययोजनेमुळे कुंडात बुडुन होणाऱ्या मृत्युला आळा घालण्यास मदत होणार आहे.यंदाच्या पावसाळ््यात दमदार पाऊस झाल्याने कोंडेश्वरचा धबधबा फेसाळू लागल्यावर लागलीच पर्यटकांची या ठिकाणी गर्दी सुरू झाली. केली होती. शेकडो पर्यटक गर्दी करत असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीसांनी सुरक्षेच्या उपाययोजना केल्या. असे असले तरी अनेक पर्यटक कसलीही तमा न बाळगता या धबधब्याच्या कुंडात उंचावरुन उड्या मारतात. अनेक पर्यटकांना कुंडातील कपारींचा अंदाज येत नसल्याने ते कपारीत अडकतात. त्यात अनेक पर्यटकांचा मृत्यूही झाला आहे. पावसाच्या सुरुवातीलाच चार पर्यटकांचा मृत्यू झाल्यावर कोंडेश्वर धबधबा हा मृत्यूचा सापळा झाल्याची चर्चा होती. असे असले तरी पर्यटकांची गर्दी मात्र कमी होत नाही. भविष्यात पर्यटकांचा मृत्यू होऊ नये यासाठी आमदार किसन कथोरे यांनी या धबधब्याची पाहणी केली होती. धबधब्याच्या वरील बाजुस आणि परिसरात काटेरी तारा लावण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार या कुंडाभोवती आणि धबधब्याच्या वरच्या बाजुला काटेरी तारांचे कुंपण घालण्यात आले आहे. या सुरक्षेच्या उपायामुळे आता मस्तीखोर पर्यटकांना कुंडात उड्या मारता येणार नाहीत. कोणी तसा प्रयत्न केल्यास तो या काटेरी तारांमध्ये अडकेल.‘‘गेल्या पाच वर्षात कोंडेश्वर धबधब्यांवर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. येथे अपघात होऊ नयेत, यासाठी तारा बांधण्यात आल्या आहेत. त्यामुळे कुंडात कोणीच उड्या मारू शकणार नाही. प्राथमिक स्तरावर ही उपाययोजना आहे. भविष्यात कायमस्वरुपी उपाय योजण्यात येणार आहेत. - राजेंद्र सोमवंशी, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.