शहरं
Join us  
Trending Stories
1
कोरोनावरील लसीमुळे वाढलंय तरुणांना हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण? AIIMS, ICMRने दिली अशी माहिती 
2
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
3
त्या बेटावर २० दिवसांत ७०० हून अधिक भूकंप! ५ जुलैला काय वाढून ठेवलेय, बाबा वेंगाची भविष्यवाणी आणि...
4
पाकिस्तानसोबत मिळून युनूस यांची कोणती खेळी?; ३ पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यांचा ओळख लपवून दौरा
5
Sonam Raghuwanshi : सोनम रघुवंशी आणि राज कुशवाहने गुपचूप केलेलं लग्न, काय आहे २ मंगळसूत्रांमागचं रहस्य?
6
पत्नीसोबत वाद झाला आणि तो आत्महत्या करण्यासाठी उड्डाण पुलावर आला; पुढे काय घडलं व्हिडीओ बघा
7
मस्क-ट्रम्प शाब्दिक युद्ध, राष्ट्राध्यक्ष म्हणाले, तुम्हाला दक्षिण आफ्रिकेत परत जावे लागेल...
8
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
9
डोनाल्ड ट्रम्प यांचं 'One Big Beautiful Bill' सीनेटमध्ये मंजूर; ट्रम्प आणि मस्क यांनी एकमेकांना दिली 'ही' धमकी
10
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
11
Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा
12
HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल
13
Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!
14
ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?
15
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
16
पाठीमागून आला लाथ मारली, नंतर गर्लफ्रेंडचा चिरला गळा, तरुणाने वडिलांसमोरच घेतला जीव, का केली हत्या?
17
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
18
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!
19
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
20
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार

ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर

By प्रज्ञा म्हात्रे | Updated: October 15, 2024 20:31 IST

ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस यांनी केली पत्रकार परिषदेत घोषणा.

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : हिंदी मराठी चित्रपट आणि मालिका सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय गोखले यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार सोहळा १४ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वा. डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रदीप ढवळ यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. तसेच, गेल्यावर्षीपासून गंधार बालकलाकार पुरस्कार सुरू केला असून यंदाचा पुरस्कार स्पृहा दळी हिला देण्यात येणार आहे. 

गंधार या बालनाट्य संस्थेच्यावतीने गंधार गौरव सोहळ्याचे दरवर्षी आयोजन केले जाते. यंदाचे हे नववे वर्षे आहे. ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी, विद्या पटवर्धन, दिलीप प्रभावळकर, अशोक समेळ, नरेंद्र आंगणे, अतुल परचुरे, सचिन पिळगावकर तर गेल्यावर्षी महेश कोठारे यांना आतापर्यंत गंधार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यंदाचा हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते गोखले यांना देण्यात येत आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रदीप ढवळ, ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे  आणि ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या हस्ते गोखले यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. यावेळी बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलम शिर्के - सामंत देखील उपस्थित राहणार आहेत. गेल्यावर्षीगंधार बालकलाकार पुरस्कार खुशी हजारे हिला दिला होता. मे महिन्यात गंधारतर्फे विविध जिल्ह्यांत गंधार गौरव बालनाट्य स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेसाठी ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद येथून प्रवेश आले होते. या स्पर्धेसाठी मकरंद पाध्ये आणि प्रकाश निमकर यांनी परीक्षण केले होते. या स्पर्धेतील नामांकने देखील आज जाहीर करण्यात आली. या पत्रकार परिषदेला गंधारचे प्रा. मंदार टिल्लू, सुनील जोशी, अमोल आपटे, वैभव पटवर्धन, पी. एन. पाटील आदी उपस्थित होते.  यंदाच्या युवा पुरस्काराचे मानकरी १ जान्हवी किल्लेकर २ गौरव मोरे३. अंशुमन विचारे बालनाट्य संस्था पुरस्कार यावर्षी न्यू नटराज थिएटर पुणे (संस्था प्रमुख दिलीप नाईक) या संस्थेला देण्यात येणार आहे.

टॅग्स :thaneठाणे