शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

ठाण्यात कचरा वेचणाऱ्याने परत केली ३२ हजारांची रोख रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 06:46 IST

रिक्षावाला किंवा सर्वसामान्य नागरिकांचा प्रामाणिकपणा आपण ऐकून किंवा पाहून आहोत. दरम्यान, कचरा वेचणाºयाचाही प्रामाणिकपणा आता ठाण्यात समोर आला आहे.

ठाणे  - रिक्षावाला किंवा सर्वसामान्य नागरिकांचा प्रामाणिकपणा आपण ऐकून किंवा पाहून आहोत. दरम्यान, कचरा वेचणाºयाचाही प्रामाणिकपणा आता ठाण्यात समोर आला आहे. रेल्वेलाइनवर मिळाली पर्स आणि त्यातील चक्क ३२ हजारांची रोकड विश्वजित गुप्ता याने मंगळवारी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून ठाण्यातील घोडबंदर रोडवरील रेल्वे प्रवासी महिलेला परत करून आपल्यातील प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले.घोडबंदर रोड येथे राहणाºया अक्षता मंगळवारी दुपारच्या सुमारास लोअर परेल येथून ठाण्यात येण्यासाठी निघाल्या होत्या. सुरुवातीला त्या लोअर परेल येथून परेल स्टेशनवर आल्या. तेथून त्या धीम्या लोकलने दादर येथे उतरल्या आणि दादर येथून त्यांनी आसनगाव ही जलद लोकल पकडली. मात्र, ऐन कामावरून परतणाºया चाकरमान्यांच्या गर्दीत त्या सापडल्या. याचदरम्यान, ठाण्यातील फलाट क्रमांक -५ येथे उतरताना लोकलमध्ये चढण्यासाठी अचानक गर्दी वाढली. त्यामुळे उतरण्याच्या घाईगडबडीत त्यांची पर्स गर्दीत पडली. परंतु, ती नक्की कुठे पडली, हे लक्षात येत नसल्याने त्या पुन्हा त्या लोकलमध्ये चढल्या. दरम्यान, त्यांनी पर्स पडल्याची माहिती आपल्या सहकाºयाला दिली. तो त्या फलाट क्रमांक ५ येथे पर्सचा शोध घेत असताना एक कचरा वेचणारा विश्वजित त्यांना दिसला. त्याच्याकडे ती पर्स असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्याने पर्स मागितली असता विश्वजितने मात्र पर्स ठाणे रेल्वे प्रबंधक कार्यालयाकडे जमा केली.विश्वजितने जमा केलेली पर्स संबंधित प्रवासी महिलेला ओळख पटवण्यास सांगून ठाणे रेल्वे उपप्रबंधक विजय रजक यांच्या हस्ते परत करण्यात आली. त्यांना त्यांची रक्कम परत मिळाली. यापूर्वीही पारसिक बोगद्याजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून एक बॅग पडली होती. त्यामध्ये जवळपास लाखो रुपयांचा ऐवज होता. ती बॅगही रेल्वे प्रशासनाने तातडीने परत केली असल्याची माहिती ठाणे रेल्वे प्रबंधक सुरेंद्र महिधर यांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेnewsबातम्या