शहरं
Join us  
Trending Stories
1
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
2
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
3
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
4
उड्डाण करताच डाव्या बाजूचं इंजिन पेटलं; आगीमुळे बोईंगचे इमर्जन्सी लँडिंग
5
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
6
आधी ‘तिने’ तीन कोटी उकळले,  नंतर आणखी १० कोटी मागितले! ‘हनी ट्रॅप’ची चर्चा
7
सूक्ष्म धूलिकण करतात फुप्फुसांवर हल्ला; मुंबईतील प्रदूषणाचे गंभीर आरोग्य परिणाम
8
ईडी कोणी ड्रोन नाही की सुपरकॉप नाही...मद्रास उच्च न्यायालयाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे
9
आमचा हात, तुमचा गाल... ही युती किती काळ? मुंबईतील मराठीच्या अस्तित्वाची लढाई
10
हे कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या?
11
पालिकांच्या मदतीने प्रदूषण रोखण्याचा प्रयत्न; मुंबईत हवा गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न सुरू!
12
रुग्णांसाठी समुद्रात उतरणार हेलिकॉप्टर..! मुंबईत कोस्टल रोडवर 'सी-हेलिपॅड'ची संकल्पना
13
हेरगिरी, ‘हनिट्रॅप’ आणि लाखोंची हकालपट्टी! हेरगिरीच्या संशयामुळे अफगाण निर्वासितांचे हाल
14
हायकोर्टाचे कोल्हापूर खंडपीठ स्थापन होणार ना? चर्चांना उधाण
15
कोल्हापुरी चप्पल ‘चोरण्याची’ हिंमतच होऊ नये म्हणून...
16
योगींचा दिल्ली दौरा अन् प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा; ओबीसी चेहरा किंवा महिला नेत्याची होऊ शकते निवड
17
नोकरीसाठी अडचण नको म्हणून चक्क पोटच्या मुलीलाच विकले
18
हवाई सुंदरीवर अत्याचार; क्रू मेंबरला अटक, मीरा रोड येथील घटना
19
प्रचंड उष्म्यामुळे विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणावर होतोय परिणाम, दीड वर्षांपर्यंत होऊ शकते घट
20
जगातील कोणीही भारताला आदेश देऊ शकत नाही, ट्रम्प यांचा दावा अन् उपरराष्ट्रपतींचे खडेबोल

चोवीस तास पाण्यासाठी ठामपाची कोट्यवधींची पंचवार्षिक योजना

By admin | Updated: March 23, 2017 01:33 IST

ठाणे महापालिकेने पाच वर्षांचे व्हिजन ठाणे तयार केले असून त्याचाच एक भाग म्हणून पाण्याचे नियोजन, वितरणव्यवस्था मजबूत करण्यासाठी

अजित मांडके / ठाणेठाणे महापालिकेने पाच वर्षांचे व्हिजन ठाणे तयार केले असून त्याचाच एक भाग म्हणून पाण्याचे नियोजन, वितरणव्यवस्था मजबूत करण्यासाठी आणि ठाणेकरांना समान पद्धतीने पाणी देण्यासाठी अतिशय महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या योजनेतून ठाणेकरांना पुढील पाच वर्षांत २४ बाय ७ पाणीपुरवठा आणि वितरणव्यवस्थेचे रिमॉडेलिंग करण्याचे निश्चित केले आहे. यासाठी पुढील पाच वर्षांच्या या दोनही योजनांसाठी कोट्यवधींची आर्थिक तरतूद केली जाणार आहे. त्यानुसार, या दोन्ही महत्त्वाकांक्षी योजनांचा समावेश यंदाच्या अर्थसंकल्पातही केला आहे.ठाणे शहराला आजघडीला ४८० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत आहे. यामध्ये स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून २००, एमआयडीसी ११०, स्टेम ११० आणि बीएमसीकडून ६० एमएलडी असा पाणीपुरवठा होत आहे. शहरात पाणीटंचाई निर्माण झाली की, २४ तासांचे शटडाउन घ्यावे लागते. परंतु, पुन्हा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी ४८ तासांचा कालावधी जातो, त्यामुळे अनेक भागांना कमी दाबाने पाणी येत असते. ठाण्याच्या भौगोलिक रचनेनुसार एकीकडे डोंगर आणि दुसरीकडे खाडी असून भूपृष्ठाचा समतोल योग्य असला तरीदेखील केवळ साठवणुकीअभावी वितरणव्यवस्थेत समतोल राखला जात नसल्याचे पालिका मान्य करीत आहे. त्यामुळेच आता महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी साठवणुकीचे प्रमाण वाढवण्यासाठी शहरात नव्याने १२ जलकुंभ उभारण्याचे काम हाती घेतले आहे. त्यानुसार, कळवा भागात ६, आनंदनगर-कासारवडवली १, सिद्धाचल १, बाळकुम २, जॉन्सन १ आदी जलकुंभांचे काम सुरू असून यातील काही जलकुंभांची कामे पूर्ण झाली असून काहींची कामे अंतिम टप्प्यात, तर काही नव्याने सुरू होणार आहेत. (प्रतिनिधी)