शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचाराच्या चक्रव्युहातील ठाणे जिल्ह्यातील करोडोच्या ४९८ पाणी पुरवठा योजना; ३२ जणांवर गुन्हे दाखल

By सुरेश लोखंडे | Updated: October 28, 2018 17:01 IST

गावखेड्यांच्या या ४९८ योजनापैकी १५१ योजनांची कामे पूर्ण झाली मात्र अद्याप पाणी पुरवठा नाही. १३३ योजनांची किरकोळ कामे बाकीच आहेत. तर ११२ योजनांव्दारे सध्या पाणी पुरवठा सुरू आहे. ६२ योजना प्रगतीपथावर आहेत आणि ८ योजना रद्द कराव्या लागल्या आहेत. या योजनांबरोबरच १३७ विहिरीची कामे हाती घेतली होती. त्यापैकी ९१ विहिरीपूर्ण झाल्या आणि ४२ विहिरी अर्धवट आहेत. एकीचे काम प्रगतीपथावर असून तीन विहिरी रद्द केल्या आहेत.

ठळक मुद्देकेवळ ११२ योजनां पाणी पुरवठा करीत आहेतभ्रष्टाचारामुळे मुरबाड व शहापूर तालुक्यातील ३२ जणांवर गुन्हे ग्रामीण पाणी पुरवठा योजना केंद्र शासनाने २००९- १० या कालावधीत राबवल्या

ठाणे : जिल्ह्यातील गावकऱ्यांच्या ग्रामीण पाणी पुरवठा योजना गेल्या दहा वर्षापासून भ्रष्टाचा-याचे कुरण ठरल्या. करोडो रूपयांच्या या योजनांमधील भ्रष्टाचारामुळे मुरबाड व शहापूर तालुक्यातील ३२ जणांवर गुन्हे ही दाखल झाले. आतापर्यंत केवळ ११२ योजनां पाणी पुरवठा करीत आहेत. रखडलेल्या योजनांमुळे गावखेड्यातील रहिवाशी आजपर्यंत च्या पाणी पुरवठ्यापासून वंचित आहेत. यास जिल्हा परिषदेचा दुर्लक्षितपणाही कारणी भूत असल्याचे बोलले जात आहे.पाणी टंचाईतून मुक्त करण्यासाठी या योजना हाती घेतल्या होत्या. जागतिक बँकेचे अर्थ सहाय्य असलेल्या ग्रामीण पाणी पुरवठा योजना केंद्र शासनाने २००९- १० या कालावधीत राबवल्या. आता या ग्रामीण पाणी पुरवठा योजनांचे ‘राष्टÑीय ग्रामीण पेयजल ’ असे नामकरण झाले. सुमारे दहा वर्षाच्या कालावधीपासून सुरू असलेल्या ४९८ या पाणी पुरवठा योजनांसह १३७ विहिरींची कामे भ्रष्टाचाराच्या वाळवीमुळे अर्धवट रखडलेली आहेत. लोकसहभागातून राबवलेल्या या कामांची आखणी, अंमलबजावणी व देखभाल दुरूती स्थानिक ग्राम पंचायतींच्या नळपाणी पुरवठा समितीने करायची असल्यामुळे त्यात मोठ्याप्रमाणात करोडोचा भ्रष्टाचार झाला. दरम्यानच्या काळात समित्यांचे पदाधिकारही बदली झाले. यामुळे अर्धवट स्थितीत राहिलेल्या योजनांची काम अद्याप ठिकठिकाणी सुरू आहेत.गावखेड्यांच्या या ४९८ योजनापैकी १५१ योजनांची कामे पूर्ण झाली मात्र अद्याप पाणी पुरवठा नाही. १३३ योजनांची किरकोळ कामे बाकीच आहेत. तर ११२ योजनांव्दारे सध्या पाणी पुरवठा सुरू आहे. ६२ योजना प्रगतीपथावर आहेत आणि ८ योजना रद्द कराव्या लागल्या आहेत. या योजनांबरोबरच १३७ विहिरीची कामे हाती घेतली होती. त्यापैकी ९१ विहिरीपूर्ण झाल्या आणि ४२ विहिरी अर्धवट आहेत. एकीचे काम प्रगतीपथावर असून तीन विहिरी रद्द केल्या आहेत. या योजनांमध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार मुरबाड तालुक्यात झाला. यामुळे संबंधीत ग्राम पंचायतींचे तत्कालीन सरपंचासह समिती सदस्य आदीं २८ जणांवर फौजदारी गुन्हा दाखल झाले. या तालुक्यात १७६ योजना हाती घेतल्या. पण दहा वर्षाच्या कालावधीत केवळ ४२ योजनांव्दारे पाणी पुरवठा सुरू आहे. उर्वरित ३८ योजनांचे काम पूर्ण झाले. तर ३२चे कामे अर्धवट असून २८ योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत आणि ८ योजना रद्द कराव्या लागल्या आहेत. १२ विहिरीची कामे हाती घेतली असता नऊचे काम पूर्ण असून तीन विहिरी अर्धवट आहेत.शहापूर तालुक्यातील तीन जणांवर गुन्हा नोंद झाले. दोन योजना रद्द कराव्या लागल्या. १३३ योजनांपैकी ३९ योजनां पाणी पुरवठा करीत आहेत. २१ योजनांची कामे पूर्ण झाली. तर ४३ योजनां किरकोळकामांमुळे अर्धवट असल्याचे सांगितले जात आहे. अंबरनाथ तालुक्यात ४४ योजना घेतल्या त्यापैकी केवळ चार योजना आजमितीस पाणी पुरवठा करीत आहेत. २६ योजनांचे कामे पूर्ण झाल्याचा दावा आहे तर १२ योजनांची किरकोळ अर्धवट कामे बाकी आहेत. कल्याणमध्येही ३२ योजनांपैकी चार योजनांचा पाणी पुरवठा आहे. उर्वरित पाच अर्धवट असून २३ योजनांची कामे पूर्ण झाली.** २८ कोटींचा निधी पडून - रखडलेल्या योजनांची काम कालबध्द पध्दतीने पूर्ण करण्यात आहेत. यानुसार गेल्या वर्षी म्हणजे २०१७ -१८ ला २४ कामांचे उद्दीष्ठ हाती घेतले. त्यासाठीचे २८ कोटी ९१ लाखाची तरतूदही केली. पण केवळ ११ योजनांची कामे झाली. वर्षभरात केवळ पाच कोटी ६० लाख रूपयांचा खर्च ग्रामीण पाणी पुरवठा विभागास करता आला. यंदाही १३ कोटी ३५ लाखांची १३ कामे हाती घेतली आहेत . त्यातील जूनपर्यंत एक योजना पूर्ण होऊन २४ लाखांचा खर्च झाल आहे. या आॅक्टोबरमध्ये ११ कामे पूर्ण होणार असल्यचे सांगितले जात आहे.

टॅग्स :thaneठाणेwater shortageपाणीटंचाई