शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

साडेचौदा हजार फायली अभिलेखात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 01:43 IST

राज्य शासनाच्या ‘झीरो पेंडन्सी’ उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये मागील काही वर्षांपासून पडून असलेल्या फायलींचा

ठाणे : राज्य शासनाच्या ‘झीरो पेंडन्सी’ उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये मागील काही वर्षांपासून पडून असलेल्या फायलींचा निपटारा करण्यात आला. त्यातील १४ हजार ५५४ फायलींचा महत्त्वपूर्ण कार्यालयीन दस्तऐवज अभिलेखा कक्षात सुरक्षित ठेवण्यात आला आहे. या दस्तऐवजांसह आता २५ हजार महत्त्वाच्या फायलींच्या दस्तऐवजाचे अद्ययावत पद्धतीने जतन करण्यात आले आहे.कार्यालयीन दस्तऐवज आता अद्ययावत करण्याचा उपक्रम जि.प.च्या सर्वच विभागांमध्ये सुरू आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक भीमनवार यांच्या सूचनांनुसार ‘अभिलेख वर्गीकरणाचे काम अधिकाºयांसह कर्मचारी जोरदारपणे करत आहेत. यामुळे ‘झीरो पेंडन्सी अ‍ॅण्ड डेली डिस्पोजल’ अर्थात ‘शून्य प्रलंबितता आणि दैनिक निर्गती’ या कार्यालयीन पद्धतीचा अवलंब अधिकारी व कर्मचाºयांकडून करण्यात येत आहे. १० नोव्हेंबरपर्यंत हा उपक्रम जि.प.सह पंचायत समित्यांमध्ये राबवण्यात येत आहे.या दस्तऐवजांमध्ये ‘अ’ श्रेणीचे दस्तऐवज कायमस्वरूपी आहेत. तर, बी श्रेणीचे ३० वर्षे कालावधीचे दस्तऐवज असून ‘क’ श्रेणीचे १० वर्षांसाठीचे दस्तऐवज आहेत. याशिवाय, ‘क-१’ श्रेणीचे दस्तऐवज पाच वर्षांच्या कालावधीसाठी राहणार आहे. तर, ‘ड’ श्रेणीच्या दस्तऐवजाचा म्हणजे फायलीचा निर्णय एका वर्षात लावून ते फाडून टाकण्याचे काम कर्मचारी करत आहेत. वर्षानुवर्षांपासून जि.प. व पं.स.मध्ये अभिलेख साठलेला आहे.