शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणाकरिता तयार केलेली १३ बनावट ओळखपत्रे सापडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 08:05 IST

चोप्राचे प्रकरण उघड झाल्यावर महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी चारजणांची चौकशी समिती नेमली असून, या समितीने पहिल्याचदिवशी अशी १३ बनावट ओळखपत्रे तयार करून लस घेतल्याचे निदर्शनास आणले.

ठाणे : दाक्षिणात्य अभिनेत्री मीरा चोप्राने ठाणे महापालिकेच्या पार्किंग प्लाझा येथील लसीकरण केंद्रात बनावट ओळखपत्राच्या आधारे लस घेतल्याचे प्रकरण गाजत असतानाच, अशी आणखी १३ बनावट ओळखपत्रे तयार केल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. या ओळखपत्रांच्याआधारे कितीजणांनी लस घेतली ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. चोप्राचे प्रकरण उघड झाल्यावर महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी चारजणांची चौकशी समिती नेमली असून, या समितीने पहिल्याचदिवशी अशी १३ बनावट ओळखपत्रे तयार करून लस घेतल्याचे निदर्शनास आणले.शनिवारी चोप्राने लस घेतल्यानंतर सुरुवातीला सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले. त्यानंतर टीका सुरू झाल्यानंतर तिने ते फोटो काढून टाकले. तसेच चोप्राने आरोप फेटाळले. पार्किंग प्लाझा कोविड सेंटरमध्ये सुपरवायझर असल्याचे चोप्राचे बनावट ओळखपत्र उघड होताच प्रकरणाला गंभीर वळण लागले. या ओळखपत्रावर ठाणे महापालिकेचा लोगा आणि ओम साई आरोग्य केअर प्रा. लि., या संस्थेचे नाव आहे. ही संस्था ग्लोबल व पार्किंग प्लाझा कोविड सेंटरचे काम पाहते. लागलीच आयुक्त डॉ. शर्मा यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित केली. समितीमध्ये उपायुक्त विश्वनाथ केळकर, डॉ. अनिरुध्द माळगावकर, आरोग्य अधिकारी आणि वर्तकनगर सहायक आयुक्त प्रणाली घोंगे यांचा समावेश असून, तीन दिवसांत चौकशी पूर्ण करण्यास सांगितले आहे.चौकशीच्या पहिल्यादिवशीच आणखी १३ बनावट ओळखपत्रे आढळून आली. ही ओळखपत्रे कोणाकोणाच्या नावे तयार केली आहेत, त्या ओळखपत्रांचा गैरवापर करून कितीजणांनी लस घेतली, ही माहिती समितीने दिलेली नाही. आमची माहिती आयुक्तांना सादर केल्या जाणाऱ्या अहवालात नमूद करू, असे समितीमधील सदस्यांनी सांगितले. तसेच ज्यांनी बनावट ओळखपत्राद्वारे लस घेतली, त्याबाबत आणखी पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस