शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी शहरवासीयांची तहान भागणार; आमदार रईस शेख यांच्या प्रयत्नांना यश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 17:58 IST

अखेर मुंबई महानगर पालिकेने आमदारांच्या मागणीला हिरवा कंदील दाखविल्याने भिवंडी शहराला आता २ दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणीपुरवठा प्रतिदिन होणार आहे.

नितिन पंडीत 

भिवंडी ( दि . ९ ) भिवंडी शहरातील तीव्र पाणी टंचाईची समस्या निकाली काढण्यासाठी भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख यांनी बृहमुंबई महानगर पालिकेकडे भिवंडी शहरासाठी अतिरिक्त २ दशलक्ष लिटर पाण्याची वेळोवेळी मागणी केली होती . त्यासाठी आमदार शेख यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनासोबत अनेक बैठकादेखील आयोजित केल्या होत्या .

अखेर मुंबई महानगर पालिकेने आमदारांच्या मागणीला हिरवा कंदील दाखविल्याने भिवंडी शहराला आता २ दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणीपुरवठा प्रतिदिन होणार आहे. या अतिरिक्त पाणी मंजुरीमुळे शहरातील सायरा नगर , वकील कंपाउंड , फातिमा नगर , ६० फिट रॉड परिसर , उम्मत नगर , मन्सूरबाद , गायत्री नगर चौक , राम नगर , चवींद्र डम्पिंग ग्राउंड झोपडपट्टी , गायत्री नगर पहाडी , फौजी पीर दर्गा , नुरी नगर , डोंगर पाडा , आझाद नगर , न्यू आझाद नगर , आला हजरत चौक येथील रहिवासींची पाणी समस्या सुटणार आहे . विशेष म्हणजे या पाणी वाटपाचे सुनियोजन व्हावे यासाठी आमदार रईस शेख यांच्या स्थानिक आमदार निधीतून तब्बल ३० लाख रुपयांची निधी देखील मंजूर केली आहे .

सदर योजना व पाण्याचे योग्य नियोजन यासंदर्भात मंगळवारी आमदार शेख यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीस बृहमुंबई महानगरपालिकेचे जल अभियंता राठोड , भिवंडी मनपाचे शार अभियंता एल डी गायकवाड आदी अधिकारी उपस्थित होते . दरम्यान भिवंडी संहारासाठी मुबलक व स्वच्छ पाणी पुरवठा करणे हे माझे ध्येय असून त्याकरिता मी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया आमदार रईस शेख यांनी दिली आहे .