शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पात्र शिक्षकांचा विचार करा; अन्यथा आंदोलन

By admin | Updated: September 17, 2016 01:57 IST

अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न अडचणीचा ठरत असतानाच शहापूरसारख्या आदिवासी तालुक्यात मात्र प्राथमिक शिक्षकांच्या अनेक जागा अनेक महिन्यांपासून रिक्त

भातसानगर : अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न अडचणीचा ठरत असतानाच शहापूरसारख्या आदिवासी तालुक्यात मात्र प्राथमिक शिक्षकांच्या अनेक जागा अनेक महिन्यांपासून रिक्त असल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ते होऊ नये म्हणून गटशिक्षणाधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पालकांच्या मागणीला सामोरे जाताना मात्र ही भरती करताना तालुक्यातील पात्र शिक्षकांचाच विचार करावा, अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नंदकुमार मोगरे यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.शिक्षण हक्क कायद्यानुसार मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे, या धोरणानुसार विद्यार्थी संख्येनुसार शहापूर तालुक्यात वाढीव पदांना मंजुरी मिळायला हवी होती. मात्र, ती आजपर्यंत मिळाली नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात येते. तालुक्यात १२३२ मंजूर पदे असून त्यापैकी आजही ८३ पदे अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. तालुक्यातील एकूण संख्येचा विचार करता आरटीआय शिक्षण हक्क कायद्यानुसार १०२ पदे नवीन तयार होऊन त्यांना मंजुरी मिळणे आवश्यक आहे. मात्र, ती मिळत नाही. शिवाय, रिक्त पदेही भरली जात नसल्याने अनेक शाळांना कमी शिक्षक संख्येनुसार काम करावे लागत आहे. या मंजूर ८३ पैकी ३ पदे ही मुख्याध्यापकांची असल्याने ती भरणार कधी, अशी विचारणा सर्वत्र होत आहे.याविषयी गटशिक्षणाधिकारी आशीष झुंजारराव यांना विचारले असता त्यांनी या रिक्त पदांची माहिती जिल्ह्याला कळवल्याचे सांगितले.