शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

समतेचा विचार संतकाळापासून

By admin | Updated: June 28, 2017 03:16 IST

महिलांना शिक्षण आणि ज्ञान मिळवण्याचा अधिकार संतकाळातच मिळाला. सध्या समाजामध्ये ज्या समतेचा विचार पुढे आणला जात आहे

लोकतम न्यूज नेटवर्कअंबरनाथ : महिलांना शिक्षण आणि ज्ञान मिळवण्याचा अधिकार संतकाळातच मिळाला. सध्या समाजामध्ये ज्या समतेचा विचार पुढे आणला जात आहे त्याची खरी सुरूवात ही संत काळापासूनच झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र समजून घेण्यासाठी संतपरंपरा अभ्यासणे आवश्यक असल्याचे मत संत साहित्याचे अभ्यासक सचिन पवार यांनी व्यक्त केले. मराठी वृत्तपत्र लेखक संघाचे ५५ वे राज्यस्तरीय संमेलन नुकतेच अंबरनाथ येथे झाले. दोन दिवस चाललेल्या या संमेलनात विविध कार्यक्र म झाले. संमेलनाचे उद्घाटन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते झाले. पहिल्या दिवशी आप्पा परब यांनी विरत्वाचा इतिहास समोर उभा केला. तर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या प्रबोधनात संत साहित्याचे योगदान या विषयावर बोलताना पवार यांनी संत परंपरा श्रोत्यांसमोर विषद केली. संतांच्या विचारांनी प्रेरीत होत किर्तनकार, शाहीर यांनीच महाराष्ट्राला शहाणे केले. त्यामुळे महाराष्ट्र समजून घेण्यासाठी संत परंपरा अभ्यासण्याशिवाय पर्याय नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मराठी साहित्याच्या साडेसातशे वर्षाच्या इतिहासात साडेचारशे वर्ष हे संत साहित्याचे आहेत. त्यामुळे मराठी साहित्यही संतांशिवाय अपूर्ण आहे. मागासवर्गीयांना समानतेच्या पातळीवर आणण्यासाठी सर्वप्रथम संतांनीच प्रयत्न केले. तर महिलांना ज्ञान, संतविचार जाणून घेण्याचा हक्कही त्या काळातच मिळाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.शेवटच्या सत्रात ‘वृत्तपत्र लेखक समाजातील जागल्या’ या विषयावर परिसंवाद झाला. यावेळी पत्रकारितेत उल्लेखनीय काम केल्याबद्दल अजित म्हात्रे, प्रशांत मोरे, गिरीश त्रिवेदी, श्रीकांत खाडे, शरद पवार, गणेश गायकवाड यांचा सेवा साधना पुरस्काराने गौरव केला.