ठाणे : खोपट भागात पायी जात असलेले फिर्यादी हे मोबाइलवर आपल्या आईचा फोन आला, म्हणून बोलत होते. त्याच वेळेस पाठीमागून आलेल्या दोघांनी त्यांच्या कानाला लावलेला मोबाइल अलगद खेचून घेऊन पोबारा केला. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. ही घटना २८ जून रोजी सकाळी ११.३०च्या सुमारास घडली.
------------------------------------------
अपघातात जखमी
ठाणे : राबोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५७ वर्षीय नागरिक नाश्ता आणण्यासाठी ग्लोडन डाइज नाक्यावरून कॅसलमिलच्या दिशेने रस्ता ओलांडत असताना, दुचाकी चालकाने त्यांना उजव्या बाजूने धडक दिली. यामध्ये ते जखमी झाले आहेत. या प्रकरणी त्यांनी अज्ञात दुचाकी चालकाविरोधात राबोडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ही घटना २८ जून रोजी ९.३०च्या सुमारास घडली. या प्रकरणाचा पुढील तपास राबोडी पोलीस करीत आहेत.
----------------------------------
चारचाकी चोरीला
ठाणे : वसंत विहारसमोरील सार्वजनिक रस्त्यावर पार्क केलेली चारचाकी अज्ञात चोराने चोरून नेल्याची घटना २६ जून ते २७ जून सांयकाळी ६.३०च्या सुमारास घडली. या प्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
------------------------------------------