शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

अट्टल चोरटयांना ठाणे आणि उत्तरप्रदेशातून अटक, श्रीनगर पोलिसांची कारवाई

By जितेंद्र कालेकर | Updated: December 1, 2022 21:10 IST

९२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

ठाणे: वागळे इस्टेट, इंदिरानगर भागातील एका घरात चोरी करणाºया  विरेंद्र छेदिलाल तिवारी (४७ ,रा. इंदिरानगर, वागळे इस्टेट, ठाणे) याला ठाण्यातून तर  अनुराग हिरामणी गुप्ता (३०) याला उत्तरप्रदेशातून  अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी गुरुवारी दिली. त्यांच्याकडून  रोकड, दागिने आणि मोबाईल असा ९२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

वागळे इस्टेट, इंदिरानगर, रायगड गल्ली येथील मोहिते किराणा स्टोअर्स हे दुकान फोडून चोरटयांनी ६६ हजार रुपये ५०० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना २४ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हाही दाखल झाला होता. यामध्ये कोणताही धागादोरा नसतांनाही वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक  पोलीस निरीक्षक संभाजी मोहिते, पोलीस उप निरीक्षक प्रमोद पाटील आणि जमादार माणिक इंगळे  आदींच्या पथकाने खबरी आणि  तांत्रिक माहितीच्या आधारे मासुंदा तलाव भागात चोरीचा माल विक्रीसाठी आलेल्या आरोपी  विरेंद्र तिवारी याला सापळा रचून २५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास  अटक केली.

त्याच्याकडील सखोल चौकशीमध्ये अनुराग हिरामणी गुप्ता (३०) हा त्याचा साथीदारही चोरीचा काही माल घेऊन त्याच्या मुळ गांवी उत्तरप्रदेशमध्ये रेल्वेने पळून गेल्याची माहितीही त्याच्या चौकशीत समोर आली. त्याच आधारे श्रीनगर पोलिसांच्या अन्य एका पथकाने उत्तरप्रदेशातील कानपूर भागातून रेल्वे पोलिसांच्या मदतीने अनुराग गुप्ता यालाही चोरीच्या मुददेमालासह अटक केली.  या दोघांकडून चोरीतील ३१.२३० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने आणि २५० ग्रॅम चांदीच्या दागिन्यांसह ९२ हजार ५०० रुपयांचा हस्तगत केला आहे.  पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील हे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :thaneठाणे