शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ आरोपी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

By admin | Updated: April 21, 2017 03:23 IST

तीन महिन्यांपूर्वी दिवा रेल्वे स्थानकाजवळ जनशताब्दी एक्स्प्रेसचा घातपात करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा आरोपींना ठाणे रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले

ठाणे : तीन महिन्यांपूर्वी दिवा रेल्वे स्थानकाजवळ जनशताब्दी एक्स्प्रेसचा घातपात करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा आरोपींना ठाणे रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले. त्यापैकी पाच आरोपींना ठाणे पोलिसांनी गुरुवारी अटक केली होती. २४ जानेवारी रोजी दिवा रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळांवर ३५२ किलोग्रॅमचा गंजलेला रूळ टाकून मडगाव-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेसचा घातपात करण्याचा प्रयत्न झाला होता. ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात २५ जानेवारी रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी दानिश अकबर शेख (वय २६), सुरज दिनेश भोसले (वय २५), मोहम्मद शब्बीर मोहम्मद नसीम शेख (वय ३४), नजीर उस्मान सय्यद (वय २४) आणि जयेश नागेश पारे (वय ३०) या मुंब्य्राच्या आरोपींना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने गतआठवड्यात अटक केली होती. या प्रकरणातील आणखी एक आरोपी मौला मकानदार हा दुसऱ्या एका गुन्ह्यात तळोजा कारागृहामध्ये होता. त्याच्याच सांगण्यावरून आरोपींनी घातपाताचा प्रयत्न केला होता. मुंब्य्राचे पाचही आरोपी ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस कोठडीत बुधवारपर्यंत होते. ती संपल्यानंतर ठाणे लोहमार्ग पोलिसांनी आरोपींच्या पोलीस कोठडीची विनंती न्यायालयास केली. त्यानुसार, आरोपींना २४ एप्रिलपर्यंत कोठडी सुनावण्यात आली. मौला मकानदार यालाही लोहमार्ग पोलिसांनी तळोजा कारागृहातून ताब्यात घेतले. तो २४ एप्रिलपर्यंत त्यांच्या कोठडीत राहील, असे ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दळवी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)