शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या विकासकामांची यादी घेऊन भीक मागायचे काम चालू : मंत्री सरनाईक

By धीरज परब | Updated: December 18, 2025 15:43 IST

मीरा भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांनी लोकमतशी बोलताना युतीसाठी ९५ जागां पैकी भाजपाला ६५ तर शिंदेसेनेला १७ जागा देण्याची आणि उर्वरित १३ जागा वाटून घेण्याची तयारी दर्शवली होती.

मीरारोड- आपण केलेल्या आणि माझ्या मतदारसंघात असलेल्या विकासकामांची यादी स्वतःच्या पत्रकात छापून लोकां कडे मतांची भीक मागण्याचे काम चालू असल्याची जाहीर टीका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी भाजपा आमदार नरेंद्र मेहतांचा उल्लेख न करता केली  आहे. तर जागावाटप हे सन्मानजनक आणि बरोबरीत हवे असे देखील त्यांनी म्हटले आहे. 

मीरा भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांनी लोकमतशी बोलताना युतीसाठी ९५ जागां पैकी भाजपाला ६५ तर शिंदेसेनेला १७ जागा देण्याची आणि उर्वरित १३ जागा वाटून घेण्याची तयारी दर्शवली होती. इतकेच नव्हे तर वरिष्ठानी युतीचे अधिकार मला दिल्याने सरनाईक यांना माझ्या कडे यावे लागेल अशी टिप्पणी केली होती. त्यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी वरिष्ठांशी युती बाबत बोलू अशी प्रतिक्रिया दिली होती. 

त्यातच आ. मेहतां  कडून शहरात वाटल्या जात असलेल्या पत्रकात मंत्री सरनाईक यांच्या विधानसभा मतदार संघातील तसेच त्यांनी पुढाकार घेतलेली विकास कामे आपण केल्याचे नमूद केल्याच्या कारणाने मंत्री सरनाईक संतापले असल्याचे सांगितले जाते. मंत्री सरनाईक यांनी एका कार्यक्रमात त्यांनी जाहीर भाषणात, आपण केलेल्या विकासकामांची यादी घेऊन भीक मागायचे काम चालू केले आहे. इतक्या वर्षात गटार बनवले नाही तर वॉटर लांबची गोष्ट. उलट लोकांची नळ कनेक्शन बंद करण्याचे काम त्यांनी केले अशी टीका आ. मेहतांचे नाव न घेता केली. शहरात आम्ही बरोबरचे हिस्सेदार असून युती होईल तर ती बरोबरीची आणि सन्मानपूर्वक होईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

तर आ. मेहतांनी माध्यमांशी बोलताना सांगितले कि, भीक सारखी भाषा राजकारणात शोभत नाही. त्यामुळे आम्ही दुखावले गेलो आहोत. आमच्या कडे सर्व ९५ जागांवर उमेदवारी अर्ज आले असून आम्ही त्यादिशेने कामाला सुरवात केली आहे.