शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
6
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
7
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
8
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
9
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
10
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
11
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
12
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
13
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
14
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
15
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
16
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
17
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
18
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
19
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
20
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी

पोलीस आयुक्तालयातील १४३१ हंडीमधील दही चोरणार गोविंदा

By अजित मांडके | Updated: September 6, 2023 15:55 IST

८८ ठिकाणी पथक मिरवणूक काढली जाणार आहे.

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : अरे बोल बजरंग बली की जय म्हणत आज ठाणे पोलीस आयुक्तालयात दहीहांडी उत्सवाची धुम पहावयास मिळणार आहे. त्यानुसार पोलीस आयुक्तालयात यंदा ११४७ खाजगी आणि २८४ सार्वजनिक अशा तब्बल १ हजार ४३१ दहीहांडी बांधल्या जाणार आहेत. तर १३३ ठिकाणी श्रीकृष्ण जन्मोत्सवाची धुम पहावयास मिळाली आहे. त्यातही ८८ ठिकाणी पथक मिरवणुक काढली जाणार आहे.

दहीहांडी उत्सव हा राज्यातील इतर शहरापेंक्षा ठाण्यात मोठ्या उत्साहाने साजरा होणारा सण म्हणून याकडे पाहिले जाते. ठाण्यासह कल्याण, डोंबिवली अंबरनाथ बदलापुर आदी ठिकाणी देखील आता दहीहांडीचा गाजावाजा सुरु झाला आहे. त्यातही मागील काही वर्षात या उत्सवाला देखील ग्लॅमर मिळू लागल्याने अनेक सेलीब्रेटी ठाण्याकडे येतांना दिसत आहेत. त्यामुळे मागील काही वर्षात ठाणे पोलीस आयुक्तालयात दहीहांडीची संख्या वाढल्याचे दिसत आहे.

यंदा पोलीस आयुक्तालयात दहीहांडी आणि श्रीकृष्ण जन्मोत्सवाची धुम दिसणार आहे. त्यानुसार १४३१ ठिकाणी दहीहांडी बांधली जाणार असून त्यातील दही गोंविदा चोरणार आहेत. याशिवाय १३३ ठिकाणी श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि ८८ ठिकाणी पथक मिरवणुक निघणार आहे. विशेष म्हणजे मागील काही वर्षात पोलीस आयुक्तालयात मानाच्या हंडींची संख्या देखील वाढल्याचे दिसत आहे. त्यानुसार पाच परिमंडळात १४ मानाच्या हंड्या असणार आहेत. त्यातील ठाण्यासह कल्याण डोंबिवलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यातील विविध मंत्र्यांची रेलचेल या हंडींच्या निमित्ताने दिसून येणार आहे.

परिमंडळाचे नाव - सार्वजनिक - खाजगी - श्रीकृष्ण जन्मोत्सव - पथक मिरवणूक

परि.१ ठाणे - ४६ - २७२ -१८ -१३परि. २ भिवंडी - ४९ - २१५ - २९ - २१परि. ३ कल्याण - ५६ - २६८ - ४१ - १५परि. ४ उल्हासनगर - ५० - १८२ - १५ - १६परि.५ वागळे इस्टेट - ४७ - २१० - ३० - २३एकूण - २८४ - ११४७ - १३३ - ८८मानाच्या दहीहांडी

परिमंडळाचे नावपरि.१ ठाणे - ०३परि. २ भिवंडी - ०४परि. ३ कल्याण - ०१परि. ४ उल्हासनगर - ००परि.५ वागळे इस्टेट - ०६एकूण - १४

टॅग्स :Dahi Handiदहीहंडीthaneठाणे