शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

कळवा रुग्णालयात इंन्टेसिव्हीट व अधिव्याख्यातांची होणार भरती

By अजित मांडके | Updated: August 23, 2023 15:54 IST

कळवा रुग्णालयात मागील आठवड्यात एकाच दिवशी १८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यात आणखी चार रुग्णांची भर पडली होती.

ठाणे : कळवा हॉस्पिटलमध्ये झालेल्या १८ रुग्णांच्या मृत्युनंतर येथील मनुष्यबळाचा विषय देखील चर्चेत आला होता. त्यानंतर ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने  ७२ नर्सची भरती करण्याची प्रक्रिया हाती घेतली असतांना आता आयसीयुत काम करणारे इंन्टेसिव्हीट व अधिव्याख्यातांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ३१ ऑगस्ट रोजी थेट मुलाखतींच्या माध्यमातून ही भरती केली जाणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. यात २८ अधिव्याख्याते आणि ९ इंन्टेसिव्हीट घेतले जाणार आहेत.

कळवा रुग्णालयात मागील आठवड्यात एकाच दिवशी १८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यात आणखी चार रुग्णांची भर पडली होती. या दुर्देवी घटनेनंतर या ठिकाणी असलेल्या अनेक असुविधांची चर्चा झाली होती. तसेच येथील अपुºया मनुष्यबळावर देखील अनेकांनी आक्षेप घेतला होता. कळवा रुग्णालयात १२५ शिकाऊ आणि १५० च्या आसपास तज्ञ डॉक्टर आहेत. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी महापालिकेच्या माध्यमातून डॉक्टर व इतर महत्वाची पदे भरण्याची तयारी केली होती. परंतु कमी पगार असल्याने अनेकांनी त्याकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले.  

दरम्यान मागील आठवड्यात झालेल्या दुर्देवी घटनेनंतर आता पुन्हा एकदा आरोग्य विभागाने रिक्त पदे भरण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. आता आरोग्य विभागाने ७२ पदे कंत्राटी स्वरुपात भरण्याची तयारी सुरु केली आहे. यापुढे जाऊन आयसीयु विभागात महत्वाचे मानले जाणारे ९ इंन्टेसिव्हीट भरती केले जाणार आहेत. यापूर्वी ११ पदांसाठी महापालिकेने मुलाखती घेतल्या होत्या. त्याला केवळ २ उमेदवारांनी पंसती दिली होती. उर्वरीतांनी कमी पगार म्हणून माघार घेतली होती. आता मात्र पुन्हा ९ पदांची भरती करण्याची तयारी केली आहे.

दुसरीकडे २८ अधिव्याख्यातांची पदे देखील भरली जाणार आहेत. यात बायोकेमिस्ट्री ०१, फार्मकॉलजी ०३, पी.एस.एम. ०४, जनरल मेडीसीन ०३, स्किन ०१, पीडीयाट्रीक ०१, सर्जरी ०५, ओबीजीवाय ०४, अ‍ॅनेस्थेशिया ०४ आणि इमर्रजन्सी मेडीसीन ०१ व फिजिकल मेडीसीन अ‍ॅण्ड रिहॅबिलीटीशन ०१ आदींचा समावेश आहे.

वाढीव पगार

यापूर्वी देखील महापालिकेने या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली होती. मात्र पगार कमी असल्याने अनेकांनी त्याकडे पाठ फिरविली होती. आता मात्र महापालिकेने वाढीव पगार देण्याची तयारी केली आहे. त्याला आता प्रतिसाद मिळतो का? हे पाहावे लागणार आहे.

टॅग्स :thaneठाणेhospitalहॉस्पिटल