शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

म्हसा यात्रेत यंदा पशुपक्षी प्रदर्शन नसणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 02:01 IST

जिल्हा परिषदेने म्हसा यात्रेत शेतकऱ्यांना उद्योग व्यवसायाचे प्रशिक्षण मिळावे म्हणून तत्कालीन पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते पशुपक्षी प्रदर्शनाचे उद््घाटन झाले होते.

मुरबाड : मागील वर्षी जिल्हा परिषदेने म्हसा यात्रेत शेतकऱ्यांना उद्योग व्यवसायाचे प्रशिक्षण मिळावे म्हणून तत्कालीन पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते पशुपक्षी प्रदर्शनाचे उद््घाटन झाले होते. मात्र या प्रदर्शनात भ्रष्टाचार उघड झाल्याने तो दडपण्यासाठी यंदाच्या यात्रेत हे प्रदर्शन नसेल. १० जानेवारीपासून म्हसा यात्रा सुरू होत असून जि.प.च्या कारभाराबाबत शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. हा भ्रष्टाचार दडपण्यासाठीच प्रदर्शन भरविले जात नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते रमेश हिंदुराव यांनी केला आहे.म्हसा यात्रेत इतर राज्यातून लाखो शेतकरी येत असल्याने खिल्लारी बैलांची खरेदी विक्र ी मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे या यात्रेत खिल्लारी बैलांचे एक प्रकारे प्रदर्शन बघायला मिळते. म्हणून जिल्हा परिषदेने निधी उपलब्ध करु न राज्यातील शेतकºयांना शेती व्यवसायाबरोबर दुग्धव्यवसाय, तसेच कुक्कुटपालन, शेळी पालन हे व्यवसाय करण्याची प्रेरणा मिळावी व त्यांंचा आर्थिक विकास व्हावा म्हणून राज्यस्तरावर म्हसा यात्रेत पशुपक्षी प्रदर्शन सुरू केले.या प्रदर्शनात वेगवेगळ््या संकरित गायी, म्हशी, शेळ््या, बोकड, मेंढ्या, खिल्लारी बैल, घोडे घेऊन सहभागी झालेल्या शेतकºयांना प्रवास खर्च, दोन दिवसाचे जेवण तसेच मानधन व प्रगतशील शेतकरी म्हणून मंत्र्यांकडून सन्मानचिन्ह आणि रोख पारितोषिक देण्याचे गेल्यावर्षी जाहीर केले होते. यामुळे शेतकरी जनावरे, कोंबड्या घेऊन यात्रेत सहभागी झाले होते.हे प्रदर्शन प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात येईल त्यासाठी जिल्हा परिषदेचे योग्य मार्गदर्शन घेतले जाईल. मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांच्या पाठीवर जानकर यांनी शाबासकीची थाप मारली होती. मात्र शेतकºयांच्या हितासाठी झालेल्या प्रदर्शनात पशुसंवर्धन विभागाने स्वत: चे हित साधले आहे. शेतकºयांना जेवण तसेच नाश्ता, चहापान देण्यासाठी निसर्ग कॅटरर्स ही एजन्सी मुरबाड तालुक्यातील कान्होळ गावातील असल्याचे नमूद केले असले तरी ही एजन्सी तसेच डेकोरेशनची एजन्सी या तालुक्यात अस्तित्वात नसल्याने हा खर्च पशुसंवर्धन विभागाने कुणाच्या नावे दिला हे मात्र गुलदस्त्यातच आहे. यामुळे प्रदर्शनात ठाणे जिल्हा परिषदेने घोटाळा केला असून तो दडपण्यासाठी या वर्षी म्हसा यात्रेत पशुपक्षी प्रदर्शन भरणार नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते हिंदुराव यांनी केला आहे.जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.लक्ष्मण पवार हे रजेवर गेले असल्याने त्यांचा अतिरिक्त कार्यभार माझ्याकडे सोपविण्यात आला आहे. माझ्याकडे अतिरिक्त कार्यभार असल्याने म्हसा यात्रेत पशुपक्षी प्रदर्शन भरविण्याच्यादृष्टीने मला वरिष्ठांनी आदेश दिलेले नाहीत. - डॉ. सुभाष पाठारे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी