शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील शहरांची स्वच्छता, हिरवळीचेही होणार मोजमाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 04:32 IST

येत्या १ मे २०२० रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा हीरक महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

नारायण जाधव ठाणे : येत्या १ मे २०२० रोजी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा हीरक महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. याचे औचित्य साधून नगरविकासविभागाने राज्यातील शहरे चकाचक व्हावीत, स्वच्छ महाराष्ट्र अथवा स्वच्छ भारत मिशनला चालना मिळावी, यासाठी राज्यातील सर्व शहरांसाठी १ मार्च ते ३० एप्रिल २०२० या दोन महिन्यांच्या काळात ‘हीरक महोत्सवी महाराष्ट्र नागरी स्वच्छता अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे.या काळात शहरांची केवळ स्वच्छताच नव्हे, तर त्यात सुंदरता व हिरवळीचेही मोजमाप केले जाणार आहे. यासाठी सर्व शहरांना घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासह आपल्या हद्दीतील रस्ते, चौक, वाहतूक बेटांसह उद्याने अधिकाधिक स्वच्छ, हरित, सुंदर दिसावीत, यासाठी स्पर्धा आयोजिली आहे.>ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रावर भरस्वच्छता अभियानात घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनावर भर देण्यात येत होता. मात्र, या हीरक महोत्सवी महाराष्ट्र अभियानात सर्व शहरांच्या प्रशासनाला त्यांच्या शहरांतील नाल्यांची सफाई करून ते स्वच्छ करण्यास सांगण्यात आले आहे. यात नागरिकांना सहभागी करून त्यांना त्यात कचरा टाकण्यास परावृत्त करणे, उड्डाणपुलाखालील जागा स्वच्छ करून त्यात आकर्षक उद्यान विकसित करणे, शहरांतील जाहिरात फलक काढणे, उद्यानांचे सुशोभीकरण करून त्यात ज्येष्ठ नागरिक विरंगुळा उभारण्यास सांगण्यात आले आहे.फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करादेशात फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यास सर्वच शहरांना सांगण्यात आले आहे. मात्र, कोठेही ती झालेली नाही. नेमके हेच हेरून या हीरक महोत्सवी अभियानात सर्वच शहरांच्या आयुक्त/मुख्याधिकाऱ्यांना त्यांच्या शहरांत फेरीवाला झोन तयार करून त्यात फेरीवाल्यांना बसण्यास प्रवृत्त करून इतर ठिकाणच्या फेरीवाल्यांना हटविण्यास सांगण्यास आले आहे.>‘अमृत अभियानासह चौदाव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करा’‘हीरक महोत्सवी महाराष्ट्र नागरी स्वच्छता अभियान’अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांना जो खर्च करावा लागणार आहे, तो चौदाव्या वित्त आयोगाकडून मिळणाºया निधीतून स्वच्छ महाराष्ट्र राखीव ठेवलेल्या ५० टक्के रक्कम अथवा अमृत अभियानांतर्गत मिळणाºया अनुदानातून खर्च करण्यास सांगण्यात आले आहे.