शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्याच्या आराखड्यात २६६ कोटींची होणार वाढ; जिल्हा नियोजन आराखडा जाणार १ हजार १६ कोटींवर

By अजित मांडके | Updated: January 8, 2024 18:42 IST

ठाणे जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आराखडा तयार करून त्यावर होणाऱ्या खर्चाच्या अनुषंगाने जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्ह्याचा नियातव्यव ठरत असतो.

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आराखडा तयार करून त्यावर होणाऱ्या खर्चाच्या अनुषंगाने जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्ह्याचा नियातव्यव ठरत असतो. त्यात मागील वर्षी २०२३-२४ साठी वाढीवसह ७५० कोटींच्या आराखड्यास मंजुरी देण्यात आली होती. त्यात यंदाच्या वर्षी जिल्ह्यातील कामांची निकड, कामांची आवश्यकता आणि लोकप्रतिनिधींची मागणी याचा विचार करून एक हजार १६ कोटींचा एकत्रित जिल्हा नियोजन आराखडा शासनाला सादर करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री तथा राज्यत्पादन शुक्ल मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. तसेच निधी वाढवून घेण्यासाठी राज्यस्तरीय बैठकीत सर्व आमदारांनी हजर राहण्याचे आवाहन त्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केले.  या आराखड्यास शासनाची मान्यता मिळाल्यास २६६ कोटींचा वाढीव निधी जिल्ह्याला मिळणार असल्याचे चित्र आहे.

सोमवारी नियोजन भवन येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीत देसाई यांनी ही माहिती दिली. ठाणे जिल्ह्यासाठी राज्यस्तरीय बैठकीत २०२२-२३ साठी ६१८ कोटी इतका नियातव्यय मंजूर करण्यात आला होता. तर, २०२३- २४ साठी ४७८ कोटी ६३ लाखांच्या प्रारूप आराखडा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यामध्ये गाबासाठी २७२ कोटी तर बिगर गाबासाठी १८२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे एकंदर सुमारे १४० कोटींची घट झाल्याचे दिसून आले होते. त्यानंतर ठाणे जिल्ह्याचा नियतव्यय ९०२ कोटी इतका वाढून मिळावा यासाठी, यासाठी राज्यस्तरिय बैठकीत मागणी करण्यात आली होती. त्यानंतर वाढीव निधीसह ७५० कोटींच्या आराखड्यास शासनाने मंजुरी दिली होती. त्यात सन २०२३ -२०२४ च्या मंजूर कामांपैकी ७२ टक्के कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली असून ३८ टक्के रक्कम खर्च झाला आहे. 

तसेच उर्वरित प्रशासकीय मंजुºया तत्काळ देण्याचे आदेश प्रशासनाला दिले असल्याची माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. दुसरीकडे, मागील वर्षी २०२३-२४ साठी वाढीवसह ७५० कोटींच्या अर्खाद्यास मंजुरी देण्यात आली. तर, यंदाच्या वर्षी शासनाने ६३५ कोटींचा आरखडा सादर करण्याच्या सूचन दिल्या आहेत. मात्र, जिल्ह्यातील कामांची निकड, कामांची आवश्यकता आणि लोकप्रतिनिधींची मागणी याचा विचार करून एक हजार १६ कोटींचा एकत्रित शासनाला विनंती करणारा जिल्हा नियोजनच आराखडा तयार करण्यात आला असून त्यास जिल्हा नियोजन समितीने समंती दिली असल्याची माहिती देसाई यांनी दिली. तसेच मंगळवारी राज्यस्तरीय वित्त नियोजन समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत निधी वाढवून मिळावा यासाठीचे सादरीकरण करणार असल्याचे देखील त्यांनी सांगत, सर्व आमदारांनी या बैठकीला हजर राहण्याचे आवाहन केले. स्मार्ट प्रा.आ.केंद्रासह मोडेल मराठी शाळाठाणे जिल्हावासीयांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केद्रे स्मार्ट करणार आहेत. त्यासाठी स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र तर, इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या तुलनेत मराठी शाळांचा टक्का देखील वाढवा, यासाठी मॉडेल मराठी शाळा असे दोन नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात येणार असून त्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची माहिती पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. त्यासाठी आवश्यक निधी देखील जिल्हा नियोजन मधून प्रस्तावित केले असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. तसेच नगरविकास विभागाच्या माध्यमातून महानगर पालिका, नगरपालिका क्षेत्रातील शाळांचे दजार्वाढ करणे, मॉडेल शाळा तयार करणे, तसेच महापलिका आणि नगर पालिकेच्या दवाखान्यासाठी देखील निधी मिळावा यासाठी प्रस्ताव तयार करून सर्व पालिका आयुक्तांना सादर करण्याच्या सूचना देखील त्यांनी यावेळी दिल्या.

जिल्ह्यातील रस्ते होणार सिमेंटचे कॉंक्रीटचेठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात रस्त्यांची कामे करण्यात आली आहेत. काही ठिकाणी सिमेंट कॉंक्रीटचे तर, काही ठिकाणी डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र, या रस्त्यांबाबत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधी यांनी प्रश्न उपस्थित केले. तसेच ज्या ठिकाणी डोंगर्तून येणारे पाणी, अति पावसाचे प्रमाण आणि वारंवार डांबरी रस्ते खराब होण्याचे प्रमाण यामुळे रस्ते सिमेंट कॉंक्रीटचे करण्याची मागणी देखील केली. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला बाबी तपासण्याचे आदेश पालकमंत्री देसाई यांनी दिले.

टॅग्स :thaneठाणे