शहरं
Join us  
Trending Stories
1
पाटण्यात 'मोदी वादळ', पंतप्रधानांच्या रोड शोला 3.5 किलोमीटरपर्यंत प्रचंड गर्दी
2
वडील चोरले म्हणता...! 'लावा रे तो व्हिडीओ' म्हणत राज यांनी सुषमा अंधारेंची क्लिप दाखवली; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली
3
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 
4
"...तर इस्रायल दुसऱ्याच दिवशी गाझावरील हल्ले थांबवेल"! पण हमासला बायडेन यांची एवढी एक गोष्ट ऐकावी लागेल
5
"जरा एकमेकांकडे बघा, काय उद्योग केलेत?"; फोडाफोडीवरून राज यांचा उद्धव ठाकरें, शरद पवारांवर हल्लाबोल
6
चिखलीत व्यावसायिक स्पर्धेतून गोळीबार, एक जण गंभीर जखमी 
7
पुण्यात रवींद्र धंगेकराचं पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन; वाचा नेमकं काय घडलं?
8
निवडणूक बंदोबस्तासाठी आलेल्या अमरावतीच्या होमगार्डचा मृत्यू
9
२२ वर्षीय फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, विराट कोहली पाहा किती खूश झाला; Video 
10
Jio चा धमाका, आता 895 रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार 11 महिन्यांची व्हॅलिडिटी
11
"फोडाफोडीच्या राजकारणाची सुरूवात शरद पवारांनी सुरू केली", राज ठाकरेंची टीका 
12
पश्चिम बंगालच्या संदेशखलीत पुन्हा राडा; TMC कार्यकर्त्याला महिलांनी बेदम चोपले
13
विराट कोहली अन् इशांत शर्मा यांच्यात धक्काबुक्की! Live Match मध्ये नेमके असं काय घडले?
14
'...तर मला पुन्हा तुरुंगात जाण्याची गरज नाही', CM अरविंद केजरीवालांचे जनतेला आवाहन
15
MS Dhoni भावनिक झाला! प्रेक्षकांना थांब म्हणणाऱ्या CSK ने बघा काय केले, सुरेश रैनाने मारली मिठी
16
विल जॅक्स, रजत पाटीदार यांच्या फटकेबाजीनंतरही RCB ची झाली कोंडी, DC चे कमबॅक 
17
तीन तलाक, मुस्लिम पर्सनल लॉ, राम मंदिर..; अमित शाह यांचे राहुल गांधींना 5 प्रश्न
18
ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन, रंगभूमीवरच घेतला अखेरचा श्वास
19
संदेशखळी प्रकरण : NCW अध्यक्षा रेखा शर्मा यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार!
20
चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफच्या शर्यतीत कायम, वाढवले RCB चे टेंशन 

उल्हासनगरमधील बाजारपेठांमध्ये होती शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 1:01 AM

उल्हासनगरमधील मुख्य मार्केटमध्ये अनलॉक वेळीही खरेदीदारांची नेहमी वर्दळ असते.

लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : शहरात संततधार पाऊस सुरू असून कुठेही पाणी तुंबल्याची घटना घडली नाही. संततधार पावसामुळे शहरातील मुख्य बाजारपेठांमध्ये शांतता असून नागरिक फिरकले नसल्याची प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी दिली.

उल्हासनगरमधील मुख्य मार्केटमध्ये अनलॉक वेळीही खरेदीदारांची नेहमी वर्दळ असते. मात्र, मंगळवार रात्रीपासून संततधार सुरू असल्याने ग्राहक मार्केटमध्ये फिरकलेच नाही. आमदार कुमार आयलानी यांच्या कार्यालयासमोर, कॅम्प नं-३ स्टेट बँक, मयूर हॉटेल, गुलशननगर आदी ठिकाणी काही काळ पाणी तुंबले होते.

मात्र, पावसाचा जोर नसल्याने पाण्याचा निचरा झाल्याची माहिती अग्निशमन दलाचे अधिकारी बाळू नेटके यांनी दिली. तसेच उल्हास व वालधुनी नदीने धोक्याची पातळी गाठली नसल्याचे ते म्हणाले.पावसामुळे चाकरमान्यांची दांडीच्अंबरनाथ / बदलापूर : मंगळवार रात्रीपासून पडणाºया मुसळधार पावसामुळे बुधवारी सकाळी कामावर निघालेल्या कर्मचाऱ्यांना रेल्वेसेवा विस्कळीत झाल्यामुळे दांडी मारण्याची वेळ आली. त्यातच बससेवेवरही पावसाचा विपरित परिणाम झाल्याने कामगारांना बसनेही कामावर जाणे शक्य झाले नाही.च्अंबरनाथ आणि बदलापूरमधील चाकरमानी सकाळी कामावर जाण्यासाठी निघाले. मात्र, लोकलसेवा विस्कळीत असल्याचे कळताच घरचा रस्ता धरला.च्दिवसभर जोरदार पावसाने हजेरी लावल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. अनेक नागरिकांनी घरी बसणे पसंत केले, तर बाजारपेठेतही तुरळक गर्दी दिसत होती.पावसाने नागरिकांची तारांबळच्मीरा रोड : मीरा-भार्इंदरमध्ये मंगळवारी रात्री अचानक आलेल्या मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने शहरात ठिकठिकाणी पाणी साचले होते. पावसाने नागरिकांची तारांबळ उडवलीच, पण घरात पाणी शिरल्याने त्यांचे अतिशय हाल झाले.च्मंगळवारी रात्री मुसळधार पाऊस सुरू झाला. अनेकांना भिजतच आपले घर गाठावे लागले. पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचले. शहरातील सखल भाग पाण्याखाली गेला होता. मुर्धा-मोरवा गावातही अनेकांच्या घरांत पाणी शिरले. पालिकेचे कोणी मदतीसाठी फिरकले नाही की, पाणी तुंबले तेथील कचरा काढण्यासाठीही कोणी आले नाही, अशा शब्दांत नागरिकांनी संताप व्यक्त केला.च्घरात पाणी शिरल्याने खालच्या भागात ठेवलेले साहित्य उचलण्याची घाई उडाली. सामान भिजल्यानेही नुकसान झाले. नागरिकांच्या जेवणाचेही हाल झाले. अनेक ठिकाणी तर बुधवार सकाळपर्यंत पाणी उतरले नव्हते. पावसाने महापालिका आणि नगरसेवक काय कामे करतात, हे पुन्हा चव्हाट्यावर आल्याचा संताप नागरिकांनी बोलून दाखवला.