शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

संडे स्पेशल मुलाखत - गावांच्या विकासासाठी स्वतंत्र नगरपालिकाच हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 02:09 IST

गावांमधील नागरिकांना पाण्याची सुविधा नाही.

मुरलीधर भवार 

कल्याण-डोंबिवली महापालिकेत असलेली २७ गावे वेगळी करून त्यांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याची सर्वपक्षीय संघर्ष समितीची मागणी आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्र नगरपालिकेचे दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. या मागणीसंदर्भात नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी बैठक घेतली. त्या पार्श्वभूमीवर संघर्ष समितीचे उपाध्यक्ष गुलाब वझे यांच्याशी केलेली बातचीत...

काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या पत्रानंतर सरकारने चर्चेसाठी बोलावले. यावरून संघर्ष समितीला डावलले जात आहे का?महापालिकेतून गावे वगळण्याची संघर्ष समितीची पूर्वीपासून मागणी आहे. त्यासाठी पूर्वीही लढा दिला आणि आताही पाच वर्षांपासून तो सुरू आहे. या समितीचे नेतृत्व दि.बा. पाटील व रतन पाटील यांनी केले होते. तेव्हा तत्कालीन आघाडी सरकारला गावे वगळण्याचा निर्णय घ्यावा लागला होता. त्यामुळे असा डावलण्याचा प्रयत्न कोणीही केलेला नाही आणि डावलले जाऊ शकत नाही.तुम्ही या बैठकीकडे कसे पाहता?समितीला आतापर्यंत अनेकांचे सहकार्य मिळाले. यापुढेही ते लागणार आहे. त्यामुळे अन्य कोणत्या पक्षाने अशी मागणी केली असली, तरी ती आमच्या मागणीला बळ देणारी आणि पूरकच आहे. तसेच, आम्ही जी मागणी करत आहोत, ती अन्य कोणीही करू नये, असे होणार नाही. समितीची असलेली मागणी लक्षात घेऊनच ही बैठक घेतल्याचेच आम्ही मानतो.

काही गावे वगळून नगरपालिका केल्यास ते व्यवहार्य ठरेल का?गावे वगळण्यासंदर्भात कोकण विभागीय आयुक्तांकडे ज्यावेळी सुनावणी झाली होती, तेव्हा २७ गावांतील एकूण २३ ग्रुपग्रामपंचायतींनी त्यांचे ठराव केले होते. त्यापैकी केवळ तीन गावांनी त्यांना महापालिकेत राहावयाचे आहे, असा ठराव दिला होता. सर्वाधिक गावांची मागणी डावलून असा निर्णय घेतल्यास तो व्यवहार्य ठरणार नाही.गावांमधील नागरिकांना पाण्याची सुविधा नाही. अंत्यविधीसाठी ग्रामपंचायतीने बांधलेल्या स्मशानभूमीत यावे लागते. रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. आरोग्याची सुविधा नाही. शाळा हस्तांतरित झालेल्या नाहीत. एकूणच या गावांचा विकासच रखडला आहे.नगरपालिकेच्या मागणीमागे बिल्डरलॉबी आहे, या आरोपात तथ्य आहे का?गावे वेगळी करण्याच्या मागणीमागे बिल्डरलॉबी असल्याचा आरोप केला जातो. त्यात काहीचतथ्य नाही. संघर्ष समितीचा बिल्डरांशी काहीच संबंध नाही. बिल्डरांना स्वतंत्र नगरपालिकेत कर कमी भरावा लागेल, हा झाला प्रशासकीय मुद्दा. मात्र, स्वतंत्र नगरपालिका केल्यास याच बिल्डरकडून मिळणाºया करातून आणि मुद्रांक शुल्कातून जवळपास १५० कोटी रुपयांचा महसूल मिळू शकतो. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाthaneठाणे