शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात पाणीच नाही

By admin | Updated: July 30, 2015 23:22 IST

पाणी आणि स्वच्छतागृह या मुलभूत सुविधाही वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात नाहीत. याशिवाय, पुरेशा मनुष्यबळाच्याअभावी मोठी कसरत करावी लागते..

- जितेंद्र कालेकर,  ठाणेपाणी आणि स्वच्छतागृह या मुलभूत सुविधाही वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात नाहीत. याशिवाय, पुरेशा मनुष्यबळाच्याअभावी मोठी कसरत करावी लागते..एकेकाळी आशियातील सर्वात मोठी असलेल्या वागळे इस्टेट इंडस्ट्रीयल इस्टेट विभागात एमआयडीसीनेच या पोलीस ठाण्याला जागा दिली. तेंव्हा १९७९ मध्ये त्याची स्थापना झाली. गेल्या ३६ वर्षांपासून जुनी असलेली या पोलीस ठाण्याची वास्तू आता धोकादायक आणि जीर्ण अवस्थेत आहे. वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर, मदन पाटील (गुन्हे), सुलभा पाटील आणि दिलीप साळुंखे या चार निरीक्षकांसह ३ एपीआय, ८ उपनिरीक्षक, १२२ कर्मचाऱ्यांना मंजूरी आहे. त्यापैकी निरीक्षक वगळता ६ उपनिरीक्षक आणि ३० ते ४० कर्मचाऱ्यांची याठिकाणी गरज आहे. संत ज्ञानेश्वर नगर, रामचंद्र नगर, हाजूरी आणि मॉडेला चेक नाका या चार बीटमध्ये ठाणे महापालिकेचे रायलादेवी प्रभाग समिती, कामगार रुग्णालय, पासपोर्ट, कामगार न्यायालय, प्रादेशिक परिवहन विभाग ही महत्वाची कार्यालये तसेच इटर्निटी मॉल, ४ महाविद्यालय, ४० ज्वेलर्सची दुकाने, १० बँका आदींसह आठ लाख लोकसंख्येची वस्ती या पोलीस ठाण्याच्या कार्यकक्षेत येते. चोरी, घरफोडी, फसवणूक, विनयभंग आणि फसवणूकीच्या गुन्हयांचे नेहमीच आव्हान आहे. त्यामुळे गुन्हेगारीसह इतक्या मोठया परिसराची कायदा सुव्यवस्था हाताळतांना तहान भूक विसरावी लागतेच पण, ३६५ दिवस निर्जळीही करावी लागते. एकेकाळी, सुरक्षितता म्हणून कुख्यात डॉन अरुण गवळीलाही इथल्या कोठडीत ठेवले होते. आता मात्र तीन कोठड्यांपैकी एकीची दुरवस्था असून उर्वरित एक पुरुष तर दुसरी महिला आरोपींसाठी आहे. तिथेही कोपरी, वर्तकनगर आणि श्रीनगरच्या महिला आरोपींना ठेवले जाते. त्यामुळे ती अपुरी पडते. दोन पैकी एक जीप नादुरुस्त तर गस्तीची मोठी व्हॅनही गेल्या चार महिन्यांपासून दुरुस्तीला गेलेली आहे. अशा परिस्थितीत पोलीसांकडून कार्यक्षमतेची काय अपेक्षा करणार? एका निरीक्षकाला तर कॅबिन नाही. स्वच्छतागृह नावालाच आहे. मुद्देमाल, हत्यार रुमचीही दुरवस्था आहे. प्रशस्त जागा असूनही धोकादायक आणि अपुऱ्या जागेतूनच पोलीसांना काम करावे लागत आहे. त्यामुळे किमान लोकसंख्येच्या निकषानुसार जादा संख्याबळ आणि प्रशस्त नवी इमारत मिळावी, अशी माफक अपेक्षा येथील कर्मचाऱ्यांची आहे. सरकार कडे पैसे नसतील तर युती सरकारच्या काळात परिवन मंत्री प्रमोद नवलकर यांनी जशी प्रायोजकांच्या माध्यमातून मलबार हिल आणि चर्नीरोड येथे सुसज्ज पोलीस ठाणे बांधलीत त्याचे अनुकरण ठाण्यात व्हावे अशी वर्दीची अपेक्षा आहे.