शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
4
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
5
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
6
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
7
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
8
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
9
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
10
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
12
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
13
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
14
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
15
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
16
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
17
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
18
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
19
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
20
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?

३१ खुनांसह सोनसाखळी चोरीच्या १३० गुन्ह्यांची उकलच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 23:06 IST

ठाणे-पालघरमधील गुन्ह्यांची आढावा बैठक; कोकणच्या विशेष पोेलीस महानिरीक्षकांनी घेतली शाळा

- जितेंद्र कालेकरठाणे : महिलांच्या गळ्यातील सोनसाखळीच्या होणाऱ्या जबरी चोºया तसेच गेल्या तीन वर्षांमध्ये उघडकीस न आलेले खुनाचे गुन्हे सर्व प्रकारचे कौशल्य पणाला लावून उघडकीस आणण्याचे आदेश कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक यांनी ठाणे आणि पालघर जिल्यातील पोलिसांना सोमावरी दिले आहे. काशीमीरा येथे झालेल्या गुन्हे आढावा बैठकीमध्ये त्यांनी हे आदेश दिल्यानंतर या दोन्ही जिल्ह्यांतील तपास अधिकाऱ्यांची चांगलीच झोप उडाल्याची माहिती सूत्रांनी दिली.ठाणे ग्रामीणच्या काशीमीरा भागातील एका खासगी सभागृहात १८ नोव्हेंबर रोजी कौशिक यांच्या उपस्थितीमध्ये पालघर आणि ठाणे ग्रामीण विभागातील वरिष्ठ पोलीस अधिकाºयांची गुन्हे आढावा बैठक पार पाडली. सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या या बैठकीत २०१७, २०१८ आणि २०१९ या तीन वर्षांमधील गुन्ह्यांचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय पाटील, पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग, अतिरिक्त पोलीस अधीक्षक योगेश चव्हाण, वसईचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर तसेच दोन्ही जिल्ह्यांतील वपोनि उपस्थित होते.तक्रारदार न्यायाच्या प्रतीक्षेतखून आणि जबरी चोरीचे गुन्हे उघड न झाल्यामुळे संबंधित तक्रारदार आणि त्या फिर्यादींना पोलिसांकडून न्याय मिळालेला नाही. त्यामुळे या कुटूंबांना कशाप्रकारे न्याय देता येईल.हे गुन्हे कशा प्रकारे उघड करता येतील. याबाबत अनेक प्रकारे कौशिक यांनी तपास अधिकाºयांना मार्गदर्शन देखिल केले.पुन्हा होणाºया आढावा बैठकीमध्ये यातील जास्तीत जास्त गुन्हे उघड करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. याशिवाय, चोºया, वाहन चोºया आणि महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांवरही आळा घालण्याबाबत त्यांनी आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.४० पोलीस ठाण्यांची घेतली शाळाया बैठकीमध्ये ठाणे ग्रामीणमधील १७ पोलीस ठाण्यांचा तर पालघर जिल्ह्यांतील २३ पोलीस ठाण्यांचा आढावा त्यांनी घेतला. ठाणे ग्रामीणमध्ये गेल्या तीन वर्षांत खुनाच्या १४ गुन्ह्यांची उकल झालेली नाही. (२०१७ मध्ये ४, २०१८ मधील १ आणि २१९ च्या नऊ गुन्ह्यांचा यात समावेश आहे.) तर सोनसाखळी जबरी चोरीचे ६९ गुन्हे दाखल झाले. त्यातील ३० गुन्हे उघडकीस आले असून २९ गुन्ह्यांचा तपास अद्याप प्रलंबित आहे. पालघर जिल्ह्यांत गेल्या तीन वर्षांत खुनाच्या १७ गुन्ह्यांचा छडा लागलेला नाही. (२०१७ मध्ये २, २०१८ मधील ६ आणि २०१९ च्या नऊ गुन्ह्यांचा यात समावेश आहे.) तर सोनसाखळी जबरी चोरीचे १२९ गुन्हे दाखल झाले असून यातील केवळ २८ गुन्ह्यांची उकल झाली आहे. त्यातील अजूनही १०१ गुन्ह्यांची उकल झालेली नाही.

टॅग्स :Chain Snatchingसोनसाखळी चोरीMurderखून