शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षेच्या उपायांबाबत गांभीर्य नाही, नागरिकांकडूनही नियमांचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 02:02 IST

मात्र सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर व नियमित निर्जंतुकीकरण करण्यात ढिलाई आलेली आहे.

धीरज परब मीरा रोड : मीरा-भार्इंदरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असताना सुरक्षेचे उपाय मात्र आता पहिल्यासारखे गांभीर्याने घेतले जात नाहीत. एटीएम, पालिका स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटायझर दुर्मीळ असून बँकांमध्ये सॅनिटायझर अजून दिले जाते. मात्र सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर व नियमित निर्जंतुकीकरण करण्यात ढिलाई आलेली आहे.मीरा-भार्इंदरमधील बँकांमध्ये ग्राहकांसाठी सॅनिटायझर अजूनही उपलब्ध करून दिले जात आहे. परंतु, काही बँकांमध्ये ग्राहकांची गर्दी होत असून सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडत आहे. काही नागरिक तर मास्क घालत नाहीत, वा असला तरी नाकाच्या खाली ठेवतात. पण, यासाठी बँकांचे सुरक्षारक्षक, कर्मचारीही गंभीर नसल्याचे दिसते. बँकेत गर्दी होऊ नये, म्हणून बाहेर लांब रांग लावली जाते. पण, त्यावर कुणाचेच नियंत्रण नसते. नागरिक रांगेत असताना अनेक जण थेट आत बँकेत जातात. बरेचदा त्यावरून वादही होतात.शहरात अनेक एटीएम केंदे्र असून त्यामध्ये सॅनिटायझर ठेवल्याचे दिसून आले नाही. अनेक ठिकाणी तर सुरक्षारक्षकही नसतात. त्यामुळे ग्राहकाने जर स्वत:सोबत सॅनिटायझर आणले असेल, तर त्याचा वापर करावा लागतो. बहुतांश नागरिक सुरक्षेचा विचार न करताच एटीएमचा वापर करतात. शहरात महापालिकेची सुमारे २२५ स्वच्छतागृहे आहेत. यातील काही स्वच्छतागृहे ही खाजगी संस्थांनी बांधून तेच पैसे आकारून चालवत आहेत. सुमारे १८० स्वच्छतागृहे पालिकेने साफसफाईकामी खाजगी ठेकेदारांना दिली आहेत.कोरोनाच्या संसर्गाचा सर्वात धोका आधीपासूनच अस्वच्छ असणाऱ्या या स्वच्छतागृहांमध्ये आहे. परंतु पालिका, नगरसेवक आणि ठेकेदार मात्र केवळ ठेके देण्यातघेण्यात इच्छुक असल्याने येथील स्वच्छतेकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते, असा आरोप रहिवाशांनी केला आहे. पुरेसे पाणी नाही, अस्वच्छता, साफसफाई काटेकोर नाही, तसेच हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझर तर सोडाच, साधा साबणही ठेवला जात नाही.>महापालिकेने झोपडपट्ट्यांतील सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेवर भर दिला असून मुकादम, स्वच्छता निरीक्षक यांचे नियंत्रण त्यावर आहे. झोपडपट्टी भागातून कोरोना वा अन्य साथरोग पसरू नये, यासाठी स्वच्छतागृहे नियमित स्वच्छ ठेवली जात आहेत. - डॉ . संभाजी पानपट्टे, उपायुक्त