शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

संमेलनाबाबत कोमसापचे अद्याप तळ्यातमळ्यात

By admin | Updated: September 29, 2016 03:47 IST

डोंबिवलीत होणाऱ्या ९० व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला पाठिंबा द्यायचा की नाही, याबाबत कोकण मराठी साहित्य परिषदेचा निर्णय अद्याप झालेला नाही. कोमसापचा प्रांत असलेल्या

- जान्हवी मोर्ये,  डोंबिवली डोंबिवलीत होणाऱ्या ९० व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला पाठिंबा द्यायचा की नाही, याबाबत कोकण मराठी साहित्य परिषदेचा निर्णय अद्याप झालेला नाही. कोमसापचा प्रांत असलेल्या ठाणे जिल्ह्यात हे संमेलन होत असल्याने कोमसापने त्याला पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा असल्याने त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे. मात्र, केंद्रीय शाखेकडून पाठिंब्याबाबत अद्याप भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही, अशी माहिती कोमसापच्या डोंबिवली शाखेचे अध्यक्ष मनीष पाटील यांनी दिली. कोमसाप कोकणात विविध ठिकाणी विभागीय साहित्य संमेलने आयोजित करते. विभागीय साहित्य संमेलने ही साहित्याच्या वाढीस पूरक असल्याची त्यांची भूमिका आहे. त्यामुळे या संमेलनात कोमसाप सहभागी होणार का, असे विचारता मनीष पाटील म्हणाले, डोंबिवलीत साहित्य संमेलन होत आहे. त्याचा मला आनंद आहे. डोंबिवलीच्या शाखेने त्याचे स्वागतच केले आहे. या संमेलनास माझा व्यक्तिगत पाठिंबा आहे. मात्र, शाखेचा पाठिंबा मला जाहीर करता येत नाही. कोमसापच्या केंद्रीय शाखेची भूमिका ठरली की, पाठिंब्याची घोषणा केली जाईल. पत्रलेखकांनाही स्थान हवेडोंबिवली साहित्य सभेने साहित्य संमेलनास पाठिंबा दिला आहे. साहित्य सभेचे अध्यक्ष तात्याबा शेपाळे म्हणाले, पायाने अधू असलो, तरी मला साहित्य संमेलनासाठी काम करण्याची इच्छा आहे. मी काही मोठा लेखक नाही. पण, पत्रलेखन करतो. पत्रलेखकांनाही संमेलनात स्थान असावे. ९० वर्षांनी साहित्य व सांस्कृतिकनगरी असलेल्या डोंबिवलीला संमेलनाचा मान मिळतो आहे, ही आनंदाची बाब आहे. संमेलनासाठी वर्गणी गोळा करणे, माहिती पोहोचवण्याची कामे करण्याची इच्छा शेपाळे यांनी व्यक्त केली. शेपाळे यांचे गोकूळ मित्र मंडळ आहे. या मित्र मंडळाचे कार्यकर्ते संमेलनात स्वयंसेवक म्हणून काम करण्यास तयार असल्याचे शेपाळे यांनी सुचवले.