शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

‘हुमायून’वर बिबट्या फिरकलाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 03:37 IST

बुद्ध पौर्णिमेच्या रात्रीला लख्ख प्रकाशात येऊरच्या हुमायून बंधाऱ्यावर बिबट्या येईल आणि पाणी पिताना दर्शन देर्ईल

महेंद्र सुके ठाणे : बुद्ध पौर्णिमेच्या रात्रीला लख्ख प्रकाशात येऊरच्या हुमायून बंधाऱ्यावर बिबट्या येईल आणि पाणी पिताना दर्शन देर्ईल, या आशेने सारी रात्र जागरण केले; मात्र बिबट्याच काय, तिथे साधं चिटपाखरूही फिरकलं नाही. त्यामुळे वन्यजीवांचे दर्शन घेण्याची तहान अतृप्तच राहिली.वनविभागाच्या वतीने ३० एप्रिलच्या रात्री जंगलातील पाणवठे, बंधारे, तलाव, नदी आदी ठिकाणी पाणी पिण्यासाठी येणाºया वन्यजीव प्राणी, पशुपक्षी आदींंची गणना करण्याची मोहीम मुंबई परिसरातील वेगवेगळ्या जंगल परिसरांत राबवण्यात आली. ठाण्यातील येऊरच्या जंगलातही वेगवेगळ्या ठिकाणी वनविभागाचे पथक तैनात होते. त्यातील वायुसेनेच्या हद्दीत असलेल्या हुमायून बंधाºयावर वनाधिकाºयांसह ‘लोकमत’ टीमने रात्रभर जागल करत ‘आॅन द स्पॉट’ पहारा दिला.हुमायून बंधाºयाचे वनपरिक्षेत्र वायुसेनेच्या अखत्यारित असल्याने सर्वसामान्य माणसांना जाण्यास बंदी आहे. त्यामुळे निर्मनुष्य ठिकाणी वन्यजीव नक्कीच दर्शन देतील, अशी अपेक्षा होती. जंगलातील निमुळती वाट तुडवत वनकर्मचारी निसर्गप्रेमींसोबत सायंकाळी ६ वाजल्यापासूनच पहारा देऊन होते. या रात्रभराच्या मोहिमेत अधूनमधून चंद्राचे ढगाआड जाणे, पुन्हा लख्ख प्रकाश येणे, हा खेळ मात्र आनंद देणारा होता. साºयांच्या नजरा पाणवठ्यावर खिळल्या होत्या. काजवे चमकले तरी ते एखाद्या प्राण्याचे डोळे असावे, या आशेने लगेच सारे त्या दिशेने मोठ्या आशेने बघत होते.माकडाचा आवाज येणे क्षणभरातच बंद झाले. पुन्हा शांतता. आता उजाडण्यापूर्वी एकदा पाणी पिण्यासाठी नक्की येईल, असा आशावादी विश्वास पेरला गेला. रात्र, मध्यरात्र, पहाट आणि प्रभातही झाली. चंद्र मावळायला लागला. सूर्य उगवला; पण बिबट्याच काय चिटपाखरूही त्या पाणवठ्यावर फिरकले नाही.या पाणवठ्यावर येऊरचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार यांनी दिलेल्या मध्यरात्रीपर्यंतच्या पहाºयासह नियत क्षेत्र वनाधिकारी राजन खरात, वॉचमन रतन फरले, हौशी वन्यजीवप्रेमी सत्यजित जोशी, आल्हाद ओक, निसर्गप्रेमी पुष्कर बापट, सुबोध हत्तरकी आणि गणेश विसपुते यांनी रात्रभर जागल केली.