शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ बसचा सरसकट लिलाव नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 23:52 IST

दुरुस्ती करून काही वापरात आणणार : नादुरुस्त बसचा पिंक टॉयलेटसाठी वापर

कल्याण : केडीएमटीच्या गणेशघाट आगारात सध्या खितपत पडलेल्या ६९ बसची लिलावात विक्री करण्याचा निर्णय उपक्रमाने घेतला आहे. याबाबत, ठोस निर्णय घेण्याकामी महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी या बसची पाहणी केली होती. बस लिलावासंदर्भातला स्थगित विषय शुक्रवारच्या महासभेत पुन्हा पटलावर आहे. यातील काही बस दुरुस्त करून पुन्हा मार्गावर चालवण्याचा आणि नादुरुस्त व कालबाह्य झालेल्या बसचा वापर सार्वजनिक ठिकाणी महिलावर्गासाठी पिंक टॉयलेटसाठी करण्याची भूमिका पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे. यामुळे बसगाड्यांचा सरसकट लिलाव होणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.

२०११ ते २०१४ या कालावधीत खरेदी केलेल्या ७० बसपैकी एक अपघातग्रस्त बस वगळता उर्वरित ६९ बसचा लिलाव करण्याचा निर्णय केडीएमटी उपक्रमाने घेतला आहे. याला परिवहन समितीने हिरवा कंदील दिला आहे. वास्तविक, ज्या बसचे आयुर्मान १० वर्षांपेक्षा जास्त झाले आहे, त्या बसगाड्या सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार भंगारात विक्री केल्या जातात. पण, ६९ बसचे आयुर्मान सरासरी सहा ते आठ वर्षे इतके असून सरकारी नियमाप्रमाणे त्यांचे रस्त्यावर धावण्याचे आयुर्मान दोन ते चार वर्षे शिल्लक आहे. दरम्यान, लिलावाच्या निर्णयाला माजी परिवहन सदस्य इरफान शेख यांनी हरकत घेतली आहे. जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत यातील काही बस सरकारने मंजूर केल्या आहेत. त्यामुळे लिलावासाठी केंद्र आणि राज्य सरकारचा ना-हरकत दाखला आवश्यक असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. तर, लिलावाच्या माध्यमातून आणखी एखादा घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे, असाही आरोप त्यांनी केला आहे. यावर देखभाल दुरुस्तीचा वाढलेला खर्च आणि वाहक-चालकांची कमतरता यामुळे बस लिलावात काढण्याची वेळ आल्याचे स्पष्टीकरण केडीएमटी उपक्रमाने दिले असले तरी महासभेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. बस लिलावात काढण्याचा प्रस्ताव आॅगस्टमध्ये झालेल्या महासभेत आला होता. त्यावेळी झालेल्या चर्चेत बसची पाहणी केल्याशिवाय निर्णय घेऊ नये, असा मुद्दा उपस्थित झाल्याने महापौर विनीता राणे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने १९ नोव्हेंबरला ६९ बसची पाहणी केली.

यावेळी स्थायीचे तत्कालीन सभापती दीपेश म्हात्रे, महिला बालकल्याण समितीच्या सभापती रेखा चौधरी, भाजप गटनेते विकास म्हात्रे, शिवसेनेचे गटनेते दशरथ घाडीगावकर, परिवहनचे सभापती मनोज चौधरी आणि अन्य नगरसेवकांसह केडीएमटी उपक्रमाचे व्यवस्थापक मारुती खोडके उपस्थित होते. बसच्या दुरवस्थेला उपक्रमातील अधिकारी जबाबदार आहेत, त्यांची चौकशी करावी, अशी मागणी त्यावेळी दीपेश म्हात्रे यांनी केली होती. दरम्यान, लिलावाच्या स्थगित प्रस्तावावर पुन्हा शुक्रवारच्या महासभेत चर्चा केली जाणार आहे. यावेळी काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले असताना सरसकट बसचा लिलाव होणार नाही, अशी भूमिका व्यक्तहोत आहे.‘त्या’ बसचा लिलाव होईलज्या बसची दुरुस्ती होऊ शकते, त्यांचा पुन्हा वापर सुरू केला जाईल. पण, ज्या बसचा वापरच होऊ शकत नाही, त्यांचा लिलाव केला जाईल. यातील काही बसचा वापर महिलांसाठी पिंक टॉयलेटसाठी करण्याचा निर्णय विचाराधीन असून यासाठी एका संस्थेने पुढाकारही घेतला आहे, असे स्थायी समितीचे माजी सभापती तथा नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी सांगितले. हे टॉयलेट फिरते असेल, खासकरून रेल्वेस्थानक परिसरात त्याचा वापर केला जाईल. बसच्या बाबतीत उपक्रमातील काही अधिकाºयांनी अक्षम्य हलगर्जीपणा केला असून त्यांचीही चौकशी करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे, असेही म्हात्रे म्हणाले.