शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसी हद्दीत एकही ग्रीन बिल्डिंग नाही; प्रशासनाची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 02:02 IST

ग्रीन बिल्डिंगचे निकष पाळणाऱ्यांना रेटिंग करून घेण्याचे आवाहन

कल्याण : रेन वॉटर हार्वेस्टींग, विजेची बचत, सोलार पॅनल आणि ओला-सुका कचरा वेगळा गोळा करून त्याची विल्हेवाट लावणे अशा बाबींची अंमलबजावणी करणाºया ग्रीन बिल्डिंग उभ्या करण्याकरिता पुढाकार घेण्याचे आवाहन केंद्र सरकारच्या गृह कौन्सिलच्या पश्चिम विभागाच्या प्रमुख नम्रता रणदिवे यांनी केले. मात्र त्याचवेळी कल्याण-डोंबिवली या दोन्ही शहरात ग्रीन बिल्डींगचे निकष पाळणारी एकही इमारत नसल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले.डोंबिवली शहरातील ‘साकेत’ इमारतीमध्ये हे निकष पाळले आहेत. मात्र त्या इमारतीचे ग्रीन बिल्डींगसाठी गृह कौन्सिलकडून रेटिंग करून घेतलेले नाही, असे स्पष्ट झाले. ग्रीन बिल्डिंगसाठी रेटिंग देणाºया केंद्र सरकारच्या गृह कौन्सिल व कल्याण डोंबिवली महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी ग्रीन बिल्डिंग जनजागृती सेमीनारचे अत्रे रंगमंदिरात आयोजन करण्यात आले होते.यावेळी महापौर विनिता राणे, आयुक्त गोविंद बोडके, एमसीएचआयचे माजी अध्यक्ष रवी पाटील, शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली, डोंबिवलीचे नगररचनाकार सुरेंद्र टेंगळे आदी मान्यवर तसेच बिल्डर आणि वास्तुविशारद मोठ्या संख्येने उपस्थित होते.रणदिवे यांनी प्रारंभी ग्रीन बिल्डिंगबाबत प्रेझेंटेन्शन दिले. केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रायलयाने ग्रीन बिल्डींगला चालना देण्यासाठी तीन प्रकारची रेटिंग पद्धती निर्माण केली आहे. पिंपरी-चिंचवड आणि पुणे महापालिकेने ग्रीन बिल्डिंगसाठी पुढाकार घेतला आहे. ग्रीन बिल्डींग रेटिंग करण्यासाठी पुढाकार घेतल्यास बिल्डरांना एफएसआय आणि अन्य काही गोष्टीत सूट दिली जाते. कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील बिल्डरांनी ग्रीन बिल्डिंगची संकल्पना प्रत्यक्षात उतरवावी, असे आवाहन त्यांनी केले.रणदिवे म्हणाल्या की, भारतात यापूर्वी मातीची घरे होती. आता सिमेंट काँक्रिटचे जंगल वाढले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही. २००८ पासून सरकारने रेन वॉटर हार्वेस्टींग सक्तीचे केले आहे. रेन वॉटर हार्वेस्टींग, विजेची बचत, सोलार पॅनल आणि ओला-सुका कचरा वेगळा गोळा करून त्यावर प्रक्रिया करणे या गोष्टींची अंमलबजावणी बिल्डिंगमध्ये होत असल्यास त्याला प्रत्येक कामानुसार गुण दिले जातात. ग्रीन बिल्डिंगचे रेटिंग या पद्धतीने होते. ग्रीन बिल्डिंग ही ओळख प्राप्त करून घेण्याकरिता वरील उपाययोजना करताना सुरुवातीला खर्चिक वाटत असल्या तरी त्या दीर्घकालीन परिणाकारक आणि किफायतशीर आहेत. शहरात ग्रीन बिल्डिंग उभारण्यासाठी बिल्डरांनी पुढाकार घ्यावा, असे त्या म्हणाल्या.पर्यावरण धोरणाचा मसुदा मंजुरीच्या प्रतीक्षेतकल्याण-डोंबिवलीत ग्रीन बिल्डिंग तयार झाल्या पाहिजेत, अशी अपेक्षा शहर अभियंता कोळी-देवनपल्ली यांनी व्यक्त केली. रेटिंग घेतलेली कल्याण डोंबिवलीत एकही ग्रीन बिल्डिंग नाही. एक साकेत इमारत आहे. त्यांनी ग्रीन बिल्डींगचे निकष पाळले आहेत. मात्र त्यांचे रेटिंग झालेले नाही, अशी कबुली कोळी यांनी दिली. महापालिकेचा स्मार्ट सिटीत समावेश झालेला आहे. त्यामध्ये ग्रीन बिल्डींग किती आहेत. याची तपासणी केली जाणार आहे. राज्य सरकारने पर्यावरण विषयक धोरणाचा मसूदा २०१८ मध्ये तयार केला आहे. त्याला अंतिम मंजुरी मिळणे बाकी आहे. हा मसुदा ग्रीन बिल्डींगसाठी पूरक आहे. महापालिका हद्दीत पुराचा मोठा फटका बसला. त्यासाठीही ग्रीन बिल्डिंग ही संकल्पना अत्यंत महत्त्वाचा आहे, असे त्या म्हणाल्या.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिका