शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

तेजाळलेल्या सोन्याला ‘भाव’ नाही!

By admin | Updated: May 11, 2016 01:38 IST

दीड महिन्याच्या बंदनंतर सोमवारी अक्षयतृतीयेच्या निमित्ताने मोठ्या मुहूर्ताची संधी आल्याने पालघर, ठाणे - रायगडमधील सराफांमध्ये उत्साहाचे वातावरण होते

डोंबिवली : दीड महिन्याच्या बंदनंतर सोमवारी अक्षयतृतीयेच्या निमित्ताने मोठ्या मुहूर्ताची संधी आल्याने पालघर, ठाणे - रायगडमधील सराफांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मात्र, गेल्या १५ महिन्यांतील सोन्याने एकदम उच्चांक गाठल्याने भाव २६ हजारांवरून ३१ हजार रुपये तोळ्यावर गेले. अचानकपणे पाच हजारांनी भाव वाढल्याने ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवली. त्यामुळे दिवसभरात अपेक्षेप्रमाणे ग्राहक न आल्याने सराफांच्या उत्साहावर पाणी फिरले.आॅल इंडिया जेम्स अ‍ॅण्ड ज्वेलरी ट्रेड फेडरेशनचे संचालक, ठाण्यातील ‘चिंतामणी’ ज्वेलर्सचे मालक नितीन कदम ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, एवढा मोठा मुहूर्त असून केवळ भाववाढ झाल्याने गेल्या वर्षीपेक्षा ५० टक्केही ग्राहक आले नाहीत. अचानकपणे झालेली पाच हजार रुपयांची वाढ हे एकमेव कारण असल्याचेही ते म्हणाले. दोन ते पाच ग्रॅमच्या नाणी खरेदीसाठी काहीशी गर्दी असली, तरी मुहूर्ताचे सोने म्हणून मात्र जी खरेदी व्हायची, ती मात्र झालेली नाही. ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह अन्य भागांतील लहान-मोठ्या सर्वच व्यापाऱ्यांची ही अवस्था असल्याचे ते म्हणाले. परिणामी, सराफांमध्ये नाराजी आहे. घडणावळीसह अन्य कलाकुसरीच्या दरांवर काहींनी सवलत जाहीर केली होती, तर काही व्यापाऱ्यांनी विशेष आॅफर देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तोदेखील फोल ठरला. आता गुरुपुष्यामृत या दिवशी किती प्रतिसाद मिळतो, हे बघणे औत्सुक्याचे ठरेल, असेही ते म्हणाले. मात्र, अक्षयतृतीयेसारख्या मोठ्या मुहूर्ताकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याने गुरुवारचा मुहूर्तही पाण्यात जाण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. डोंबिवलीत पूर्वेत सोमवारी दुकाने बंद असतात. त्याचा फटका सराफांना बसला. संध्याकाळनंतर काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली, तर काही ठिकाणी आधी घेतलेल्या आॅर्डरनुसार सोने देण्याची सोय करण्यात आली होती. मांडव घालण्यात आले होते. (प्रतिनिधी)