शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

कामगारांच्या थकीत वेतनासाठी पोलिसात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 00:21 IST

कंत्राटदार-युनियनचा वाद : आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप

कल्याण : केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने नेमलेला कंत्राटदार आणि महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना या युनियनमध्ये कामगारांच्या वेतनावरून निर्माण झालेला वाद आता पोलीस ठाण्यात पोहोचला आहे. कामगारांचे तीन महिन्यांचे वेतन थकवल्याप्रकरणी युनियनने महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात कंत्राटदार आणि महापालिका अधिकारी यांच्याविरोधात तक्रार देत गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. त्यात आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप केला असला तरी हे आरोप बिनबुडाचे असल्याचे स्पष्टीकरण कंत्राटदाराने दिले आहे.

केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागासाठी वाहनचालक आणि सफाई कामगार पुरवण्याचे कंत्राट विशाल एक्स्पर्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने घेतले आहे. त्यांचे १२० घंटागाडीचालक आणि २८० सफाई कामगार कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. परंतु, तीन महिन्यांपासून त्यांना मासिक वेतन मिळालेले नाही. त्यातच, कंत्राटदार कंपनी आणि महापालिका यांच्यात झालेल्या करारानुसार वेतन दिले जात नसल्याचे युनियनचे म्हणणे आहे. लेव्ही रक्कम नमूद नाही, सार्वजनिक सुटीचे पैसे नमूद नाहीत, भविष्य निर्वाह निधीची रक्कम कपात केली आहे, पण त्याचा क्रमांक कामगारांना दिलेला नाही, राज्य कर्मचारी विमा योजनेचे पैसे कापले जातात, पण त्याचे कुठलेही पत्र किंवा पुरावा कामगारांच्या नावे नसल्याकडे युनियनने लक्ष वेधले आहे.महापालिकेचे बिल मिळाले नसले तरी कामगारांना कंत्राटदाराने वेतन देणे बंधनकारक आहे. मात्र, तीन महिने त्यांना वेतन मिळालेले नाही. वेतनाची मागणी केल्यावर कामगारांना कामावरून काढण्याची धमकी दिली जाते, असाही आरोप युनियनने केला आहे.

त्याचबरोबर कंत्राटदार युनियनचे कुठलेच पत्र स्वीकारत नाही, तर महापालिका अधिकाऱ्यांना याबाबत विचारले असता समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचे युनियनच्या पदाधिकाºयांचे म्हणणे आहे.

युनियनने थकीत वेतनासाठी ३० सप्टेंबरला ठिय्या आंदोलन केले होते. याउपरही वेतन दिले जात नसल्याने पोलिसात धाव घ्यावी लागली, अशी माहिती युनियनचे उपाध्यक्ष राजेश उज्जैनकर यांनी दिली.

कंत्राटदार हा महापालिका अधिकाºयांच्या संगनमताने कामगारांची आर्थिक फसवणूक करत आहे. त्याबाबत संबंधितांवर फौजदारी कारवाई करून गुन्हा दाखल करावा, अशी युनियनची मागणी असल्याचे उज्जैनकर म्हणाले.