शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरापासून कोव्हीशिल्डचा साठा नाही, लसीकरणाचा वेग मंदावला

By अजित मांडके | Updated: November 7, 2022 16:41 IST

कोरोना कमी झाला असला तरी लसीकरण थांबता कामा नये असे बोलले जात असले तरी देखील ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागात मागील महिनाभरापासून कोव्हीशिल्डचा साठाच उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे.

ठाणे  : कोरोना कमी झाला असला तरी लसीकरण थांबता कामा नये असे बोलले जात असले तरी देखील ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागात मागील महिनाभरापासून कोव्हीशिल्डचा साठाच उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे कोव्हीशिल्डची लस घेणाऱ्यांना आता दुसरा किंवा बुस्टर डोसही मिळेनासा झाला आहे. तर लहान मुलांना कोरोनाचा धोका टाळण्यासाठी कॉब्रोव्हस ही लसही मागील १० दिवसापासून ठाण्यात उपलब्ध होऊ शकली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.         ठाणे  ठाणमहापालिकेच्यावतीने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहमेंतर्गत शहरात ३५  केंद्राच्या माध्यमातून लस दिली जाते. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी तयार करण्यात आलेल्या कोविशिल्ड व कोवॅक्सिन लसीचा डोस शासनाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार देण्याचे काम महापालिका प्रशासनाच्यावतीने सुरू करण्यात आले होते. त्यानुसार कोरोनाचा प्रभाव जेव्हा दिसत होता. तेव्हा लसीकरण देखील वेगाने सुरु होते. आता कोरोनाचा वेग मंदावला असतांना लसीकरणाचा वेगही मंदावल्याची माहिती समोर आली आहे. ठाणे  शहरात आतापर्यंत १५ ते  १७ वयोगटातील ९०.३० टक्के जणांनी पहिला डोस आणि दुस:या डोसचे प्रमाण ७१.४० टक्के एवढे आहे.  तर १८ वर्षावरील नागरीकांच्या पहिल्या डोसचे प्रमाण १००.१० टक्के आणि  दुस:या डोसचे प्रमाण ८०.१६ टक्के एवढे आहे.  तर बुस्टर डोस केवळ १ लाख ६७ हजार २३० नागरीकांनी घेतला आहे.

लसीकरण शिल्लक असतांनाही आता राज्य किंवा केंद्राकडून महापालिकेकडे कोव्हीशिल्डचा साठा मागील चार आठवडे म्हणजेच महिनाभरापासून उपलब्ध झालेला नाही. त्यामुळे दुसरा किंवा बुस्टर डोस कुठे घ्यायचा असा पेच नागरीकांमध्ये निर्माण झाला आहे. दुसरीकडे लहान मुलांना देण्यात येणा:या कॉब्रोव्हस ही लसही मागील १० दिवसापासून उपलब्ध होऊ शकली नसल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. याचाच अर्थ ठाण्यात लसीकरण सध्या थांबले असल्याचेच दिसत आहे.

दुसरीकडे शहरात सध्या केवळ कोव्हॅक्सीनचा साठा उपलब्ध असल्याने त्यामाध्यमातून लसीकरण सुरु असल्याची माहिती महापालिकेने दिली. परंतु लस उपलब्ध नसल्याने देखील लसीकरण केंद्रावरील गर्दी देखील ओसरली असल्याचे चित्र दिसत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या