शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कारखाने हजार पण अग्निशमनदल नाही

By admin | Updated: April 11, 2016 01:13 IST

मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झालेल्या वाडा तालुक्यात गेल्या अनेक वर्षात अग्निशमन केंद्र मात्र उभारण्यात आलेले नाही.

वाडा : मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झालेल्या वाडा तालुक्यात गेल्या अनेक वर्षात अग्निशमन केंद्र मात्र उभारण्यात आलेले नाही. येथील कारखान्यांमध्ये वारंवार आगी लागत असून त्या विझविण्यास होणाऱ्या विलंबामुळे कारखान्यांचे कोट्यावधी रू. चे नुकसान होत आहे. या पट्ट्यात एक हजाराच्या वर लहान मोठे कारखाने आहेत. तरीहीे अग्निशमन केंद्र नाही. वाडा तालुका ‘डी प्लस झोन’ जाहीर झाल्यापासून या परिसरात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्या दाखल झाल्या आहेत. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण झाले असून १००० च्या वर कारखाने आहेत. त्यामध्ये अनेक रासायनिक कारखान्यांचा समावेश आहे. गेल्या अनेक वर्षांच्या कालावधीत तालुक्यात अनेक दुर्घटना घडल्या आहेत. डोंगस्ते येथे अ‍े. आय. के. या रासायनिक कंपनीत रिअ‍ॅक्टरचा स्फोट होऊन त्यात संपूर्ण कंपनी जळून खाक झाली. वाडा शहरातील विजय सॉ मिलला शॉर्ट सर्कीटमुळे आग लागून ही गिरणी खाक झाली. त्यात २० लाखाहून अधिक रूपयांचे नुकसान झाले. वडवली येथे असलेल्या ओनिडा कंपनीच्या गोदामाला लाग लागून लाखो रू. चे नुकसान झाले होते. सापरोंडे ग्रामपंचायतीच्या हद्दीतल पराग केमिकल या कंपनीचे आगीत ६० लाखांचे नुकसान झाले. कोंढले येथील फायब्रॉल नॉन आईनिक्स प्रा. लि. ही रासायनिक कंपनी पूर्ण खाक झाली. वसुमती प्रिंट अ‍ॅण्ड पॅकेजिंग या कंपनीचे आगीत चार कोटीचे नुकसान झाले. वसुरी येथील सोलोमेटल कारखान्यात स्फोट होवून सात कामगार जखमी झाले होते. नुकताच मुसारणे फाटा येथे लाकडाच्या वखारीला आग लागून पंधरा लाखांचे नुकसान झाले तर शुक्रवारी रात्री वाडा आगाराची एक बस पेटून व अन्य दोन गाड्यांना त्याची झळ लागुन २० लाखांची हानी झाली अशा अनेक घटना घडत असल्याने तालुक्यात अग्निशमन केंद्राचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.(वार्ताहर)