शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

घरकुलांसाठी पात्र आदिवासी लाभार्थीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 00:29 IST

पंतप्रधान आवास योजना

सुरेश लोखंडेठाणे : जिल्ह्यात यंदाची पंतप्रधान आवास योजनेची घरकुले अद्याप मंजूर झालेली नाहीत. मात्र, गेल्या वर्षीची म्हणजे २०१९- २० ला दोन हजार ९३ घरकुले जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना, बेघर आणि मागासवर्गीय परिवारासाठी मंजूर झाले आहेत. यापैकी प्राधान्यक्रम यादीत आदिवासी (एसटी) समाजातील पात्र लाभार्थी आता शिल्लक राहिलेले नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे त्यांच्या घरांचा लक्ष्यांक शासनास समर्पित करावा लागला आहे.

कोरोनाच्या या संकटकाळी जिल्ह्यातील मागासवर्गीय, दारिद्र्यरेषेखालील परिवार आदींसाठी या आर्थिक वर्षातील पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुलांचा लक्ष्यांक मिळालेला नसल्याचे अलीकडेच जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या दिशा समितीच्या बैठकीत उघड झाले. त्याचवेळी २०१९-२० या वर्षातील दोन हजार ९३ या घरकुुलांच्या प्राप्त उद्दिष्टांंपैकी एक हजार ५९९ घरकुले बांधण्याचे उद्दिष्ट साध्य केल्याचेही या बैठकीदरम्यान निदर्शनास  आले. घरकुल योजनेच्या प्राप्त उद्दिष्टातील अनुसूचित जमातीच्या घरकुल मंजुरीचा लक्ष्यांक या योजनेचे पात्र लाभार्थीच जिल्ह्यात शिल्लक नसल्यामुळे शासनास समर्पित करावा लागल्याचे स्पष्ट झाले.

२५ पैकी ९ कोटींचा निधी खर्चगेल्या वर्षाच्या या दोन हजार ९३ घरकुलांच्या उद्दिष्टपूर्तीसाठी २५ कोटी ११ लाख रुपयांचाही निधी मंजूर झाला आहे. त्यापैकी ऑगस्टपर्यंत नऊ कोटी २८ लाख रुपयांचा निधी खर्च झालेला आहे. उर्वरित निधीतून मंजूर झालेल्या घरकुलांचे काम प्रगतीपथावर आहे. या आधीचे म्हणजे २०१६-१७ ला तीन हजार ३९९ घरकुलांपैकी तीन हजार २६७ घरे बांधून पूर्ण झाली आहेत. उर्वरित ८७ घरे रद्द करावी लागली आहेत. ४५ घरांचे काम या डिसेंबरअखेर पूर्ण होणार आहे.  २०१७-१८ मधील ७३५ घरांपैकी ७२० घरे बांधली आहेत. तर आठ घरे रद्द करावी लागली. सात घरांचे काम महिनाभरात पूर्ण होईल. यानंतरचे म्हणजे २०१८-१९ मध्ये ४६२ घरांना मंजुरी मिळाली असता ४३० घरे पूर्ण झाली आहेत. यातील उर्वरित घरांचे काम प्रगतीपथावर आहेत.

टॅग्स :thaneठाणे