शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

...तर स्काडाने तारले असते

By admin | Updated: November 12, 2015 01:39 IST

भविष्यातील पाण्याचे नियोजन करण्यासाठी ठाणे शहराला आजच्या घडीला पाणीकपातीच्या झळा सोसाव्या लागत आहेत. पाण्याचे नियोजन हे पाणीकपातीमागचे एकमेव कारण असले तरी ती करताना गळती

ठाणे : भविष्यातील पाण्याचे नियोजन करण्यासाठी ठाणे शहराला आजच्या घडीला पाणीकपातीच्या झळा सोसाव्या लागत आहेत. पाण्याचे नियोजन हे पाणीकपातीमागचे एकमेव कारण असले तरी ती करताना गळती आणि चोरी या गोष्टीदेखील गांभीर्याने घेण्याची गरज ठाणेकरांनी व्यक्त केली आहे. शहरात आजघडीला गळतीचे प्रमाण हे ४५ टक्के असून २००८-०९ साली पाण्याचे मोजमाप करण्यासाठी आणलेली स्काडा ही प्रणाली तेव्हाच राबविली असती तर कपातीचे प्रमाणदेखील कमी असते. ही यंत्रणा पुन्हा राबवावी, अशी मागणी ‘जाग’ या संस्थेने केली आहे. ठाणे शहराला आजच्या घडीला ४८० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा रोज होत असून पाणीगळतीचे प्रमाण हे ४५ टक्क्यांच्या आसपास आहे. पुरेसे पाणी असतानाही काही भागांना कपातीचा सामना करावा लागत असून योग्य नियोजन नसल्यानेही पाणी वितरण व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. केवळ पाणीपुरवठ्यावर १८० कोटी रु पये वर्षाला खर्च केले जात आहेत. तर पाणीपट्टीतून सुमारे १०० कोटी तिजोरीत जमा होत आहे. ही तफावत ८० कोटींची असून केवळ सबसिडीने नागरिकांना मिळत असलेल्या पाण्यामुळे नाही तर भरमसाट होणाऱ्या गळतीमुळे निर्माण झाली आहे. २००८-०९ साली जेएनएनयूआरएम योजनेच्या माध्यमातून ठाणे महापालिकेला स्काडा यंत्रणा राबवण्यासाठी ८ ते ९ कोटी रु पयांचे अनुदान प्राप्त झाले होते. शहरातील कचरा आणि पाण्याची अद्ययावत पद्धतीने नियोजन करण्याची अट यामध्ये टाकली होती. ही संपूर्ण यंत्रणा ठेकेदाराच्या माध्यमातून राबविण्यात येणार होती. यासाठी एका कंट्रोल रूमचीदेखील निर्मिती केली होती. विविध स्रोेतांपासून येणारे पाणी आणि कोणत्या टाकीमध्ये ते किती आहे, या सर्व गोष्टींचे मोजमाप तिच्या माध्यमातून करण्यात येणार होते. मात्र, ही यंत्रणा पालिकेला राबवता आली नसल्याची माहिती संस्थेचे मिलिंद गायकवाड यांनी दिली.