शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

थीम पार्कच्या चौकशीचा फार्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 02:13 IST

माजी महापौरांचा आरोप : आयुक्तांना केले टार्गेट

ठाणे : थीम पार्कच्या चौकशीचा अहवाल येऊनही अद्याप केवळ विभागीय चौकशीच्या पलीकडे यासंदर्भात कार्यवाही पुढे सरकलेली नसल्याचे शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत उघड झाले. माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनीच यासंदर्भात प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. मी महापौर असताना संबंधित ठेकेदारांना दिलेली ही सर्व रक्कम वसूल करण्याचे आदेश दिले होते. मात्र, चौकशीपलीकडे काहीच झाले नसल्याने त्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.

नगरसेवकांनी विचारलेला प्रश्न संबंधित विभागाला पाठवण्यावरून सर्वसाधारण सभेत सचिव विभाग आणि उद्यान विभागांमध्ये असमन्वय दिसून आला. शिंदे यांनी काही प्रश्न विचारले होते. मात्र, मुख्यालय उपायुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी आपल्याला हे प्रश्न महासभेच्या एक दिवस आधी मिळाले असल्याचा खुलासा केला. यावर सचिव अशोक बुरपुल्ले यांनी मात्र तो २० दिवस आधीच संबंधित विभागाकडे पाठवला असल्याचे सांगून यासंदर्भातील नोंदीदेखील सभागृहात दाखवल्या.यावरून महापालिकेच्या दोन विभागांत समन्वय नसल्याचे दिसून आले.तर आयुक्तांचा पर्दाफाश केला असताच्या सर्व वादग्रस्त प्रकल्पावरून मीनाक्षी शिंदे यांनी आयुक्तांनादेखील टार्गेट केले. आयुक्त या सर्वसाधारण सभेत आले असते, तर त्यांचा पर्दाफाश झाला असता म्हणूनच ते आले नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.च्ज्यावेळी नगरसेवक प्रश्न विचारात होते, तेव्हा त्यांचा ब्लॅकमेलर असा उल्लेख त्यांच्याकडून व्हायचा. आता या सर्व वादग्रस्त प्रकल्पांचे उत्तर देण्यासाठी ते सभागृहात का उपस्थित राहिले नाहीत, असा प्रश्न करून त्यांनी आयुक्तांवर निशाणा साधला.