शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

थीम पार्क चौकशी समितीला सेवा निवृत्त अधिकारी मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 16:07 IST

थीम पार्क चौकशी समितीचे घोडे अद्यापही गंगेत न्हाहले नसून या समितीला सेवा निवृत्त अधिकारी मिळालेला नाही. त्यामुळे चौकशी समितीची बैठक सुध्दा घेतली जात नसल्याची बाब समोर आली आहे.

ठळक मुद्देआयुक्तांनी नेमलेल्या समितीवर सुध्दा घेतला आक्षेपमहापौरांना भाजपाने दिले निवेदन

ठाणे - एकीकडे महापालिका आयुक्तांनी नेमलेल्या थीम पार्क संदर्भात नेमलेल्या समितीकडून चौकशी सुरु झाली असतांना दुसरीकडे महासभेने नेमलेल्या समितीला सेवा निवृत्त अधिकारीच मिळेनास झाला आहे. त्यामुळे या समितीची चौकशी केव्हा पूर्ण होणार आणि अहवाल सादर केव्हा होणार असा सवाल उपस्थित झाला आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर सेवा निवृत्त अधिकाऱ्याची नेमणुक करण्यासाठी भाजपाच्या वतीने महापौर मीनाक्षी शिंदे यांना पत्र देण्यात आले आहे.                    मागील महिन्यात २६ आॅक्टोबरला थीम पार्कच्या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या समितीची पहिली बैठक झाली होती. परंतु या बैठकीत सेवा निवृत्त अधिकारी घेण्यावरच चर्चा झाली. परंतु कोणताही ठोस असा निर्णय झाला नव्हता. या समितीच्या वतीने गिरीष मेहेंदळे यांचे नाव घेण्यात आले होते. परंतु त्यांनी काम करण्यास नकार दिला. त्यानंतर पालिकेतील अनेक सेवा निवृत्त अधिकाऱ्यांना याबाबत विचारणासुध्दा करण्यात आली. परंतु अद्यापही हा अधिकारी मिळत नसल्याने चौकशी समितीची बैठक सुध्दा पुन्हा लावण्यात आलेली नाही.                 दुसरीकडे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी नेमलेल्या स्वंतत्र चौकशी समितीने या थीम पार्कची पाहणी केली असून त्यांच्याकडून या संदर्भातील सविस्तर अहवाल तयार करण्याचे काम सुरु झाले आहे. परंतु ज्या मंडळींनी या थीम पार्कच्या बाबत महासभेत दिवसभर गोंधळ घातला, त्यांना मात्र अद्यापही सेवा निवृत्त अधिकारी मिळालेला नाही. दरम्यान भाजपा गटनेते नारायण पवार आणि मिलिंद पाटणकर यांनी सोमवारी महापौर मीनाक्षी शिंदे यांची भेट घेऊन त्यांना एक पत्र दिले आहे. या पत्राद्वारे त्वरीत सेवानिवृत्त अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी तसेच जलद गतीने या समितीची बैठक घेण्यात यावी अशी मागणी केली आहे. 

महापालिका आयुक्तांनी नेमलेल्या चौकशी समितीवर सुध्दा नारायण पवार आणि पाटणकरांनी आक्षेप नोंदविला असून देशमुख हे सध्या क्लस्टर योजनेत सल्लागार म्हणून काम करीत आहेत. तर डी. आर. मोहीते यांच्या नेमणुकीवरसुध्दा आक्षेप घेत हे या चौकशीला न्याय देऊ शकणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाcommissionerआयुक्त