ठाणे : गांधीनगर येथील एका घरातून चोरट्यांनी एक लाख ८२ हजार ४७० रुपयांचा ऐवज चोरल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरी होताना घरातील सर्व मंडळी झोपेत होती.गांधीनगर रतनसिंग चाळीतील लहानूबाई बोरुडे यांच्या घरात चोरट्यांनी २० मार्चला रात्रीच्या सुमारास दरवाजा उघडून प्रवेश केला. घरात लहानूबाई यांच्यासह त्यांचा मुलगा, सून आणि दोन नातवंडे झोपलेली होती. तेव्हाच या चोरट्यांनी कपाटातील तिजोरीतील रोकड आणि सोन्याचे दागिने असा एक लाख ८२ हजारांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण बनगोसावी अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
पावणेदोन लाखांची चोरी
By admin | Updated: March 23, 2017 01:31 IST