शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नाट्यगृहे उघडली तरी बालरंगभूमीचा पडदा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 08:31 IST

Thane : शासनाने अद्याप बालरंगभूमी सुरू करायला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे बालनाट्य संस्थांनी सबुरीची भूमिका घेतली आहे. 

ठाणे : नाट्यगृहे ही व्यावसायिक रंगभूमीसाठी खुली झाली असली तरी अद्याप बालरंगभूमीसाठी पडदा हा बंदच आहे. जोपर्यंत शाळा सुरू होत नाही तोपर्यंत बालनाट्ये होणार नाहीत. त्यामुळे सध्या वेट ॲण्ड वॉचची भूमिका असल्याचे बालनाट्य संस्थांनी ‘लोकमत’ला सांगितले. परंतु, बालरंगभूमीसाठी नाट्यगृहे बंद असली तरी नाटके बंद नाहीत. नाटकांची ऑनलाइन शाळा सुरू आहे. काही बालनाट्य संस्थांनी ऑनलाइन अभ्यासक्रमात बदल केला आहे. तर काही संस्था नाट्यप्रशिक्षण न घेता बालकलाकारांचे उपक्रमातून मनोरंजन करीत आहेत.आठवडाभरापूर्वी नाट्यगृहाचा पडदा उघडला. शासनाने अद्याप बालरंगभूमी सुरू करायला परवानगी दिलेली नाही. त्यामुळे बालनाट्य संस्थांनी सबुरीची भूमिका घेतली आहे. ऑनलाइन शाळा घरात आली त्यानंतर ऑनलाइन बालनाट्यही घरात आणले गेले. जानेवारीत कोरोनाची लस येईल, अशी अपेक्षा असल्याने दोन महिन्यांत शाळा सुरू झाली की एप्रिल-मे महिन्यात बालरंगभूमी सुरू होतील, ही दाट अपेक्षा असून उन्हाळी सुट्टीत बालनाट्ये पाहता येतील, अशी अपेक्षा बालनाट्य संस्थांनी व्यक्त केली. यासाठी काही बालनाट्य संस्थांनी अभ्यासक्रमातही बदल केला. तालमीमध्ये वर्गात रंगमंचावर मुलांना प्रयोग सादर करावे लागत. परंतु, ऑनलाइनमध्ये घरात कॅमेऱ्यासमोर प्रयोग सादर करावे लागतात, म्हणून बालकलाकारांना एकपात्री प्रयोग करण्यास उद्युक्त केले, असे चिल्ड्रेन थिएटर ॲकॅडमीचे संस्थापक राजू तुलालवार यांनी सांगितले. नाटक ही समूहाची कला असल्याने ती कला ऑनलाइन होणारी नाही, म्हणून गंधारने ऑनलाइन नाट्यप्रशिक्षण न घेता ऑनलाइन विविध उपक्रम हाती घेऊन मनोरंजन केले जात आहे. त्यामुळे बालरंगभूमीचा पडदा उघडण्याची वाट पाहत असल्याचे मत गंधारचे संस्थापक मंदार टिल्लू यांनी सांगितले.

उन्हाळी सुट्टीत बालनाट्य नाही सुरू झाले तर पर्यायी व्यवस्थादेखील आम्ही केली आहे. निवडक कलाकारांना बोलावून चित्रीकरण करून व्हिडीओ पाठविणार अथवा घरात अभिनय करून तो बनवून पाठविणार. हे दुधाची तहान ताकावर भागवण्यासारखे झाले असले तरी बालप्रेक्षकाला बालनाट्य पाहत असल्याचे समाधान मिळेल.- राजू तुलालवार

 सध्याच्या काळात बालकलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ऑनलाइन कथाकथन, कविता वाचन, एकपात्री अभिनय स्पर्धा आणि नाट्य छटा अशा विविध स्पर्धा घेण्यात येत आहेत. बालनाट्य बंद पडणार नाहीत, यासाठी काही संस्था तसेच पालकही प्रयत्नशील आहेत. 

टॅग्स :thaneठाणे