शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्याच्या चौकातील  भिंती बोलू लागल्या कविता; महापालिकेचा अनोखा उपक्रम

By अजित मांडके | Updated: November 4, 2023 12:51 IST

गेल्या काही महिन्यांपासून ठाणे शहरातील रस्त्यावरील भिंती असो या उड्डाणपूल यांची रंगरंगोटी केल्याने शहर विविध रंगांनी नाहून गेले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : एका चौकात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरीमधील ओवी, दुसऱ्या चौकात स्त्रियांना व मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे कार्य करणारे थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांनी थोडक्यात सांगितलेले काव्यरूपात शिक्षण महत्व तर आणखी एका चौकात मराठी भाषा दिन ज्यांच्या जन्मदिनी साजरा होता ते कुसुमाग्रज तसेच बहिणाबाई चौधरी,बालकवी, विं दा करंदीकर, मंगेश पाडगावकर या सारख्या कवीच्या कवितांमधील काव्यरचना थेट मनाला भिडणारे किंवा मराठी भाषेशी जवळीक साधताना दिसत आहे. असा हा अनोखा उपक्रम ठाणे महापालिका प्रशासनाने हाती घेत, शहरातील जवळपास विशिष्ट असे १४ चौकात विशेष आकाराचा भिंत उभारून मराठी भाषेप्रती प्रत्येकाच्या मनात बीज रोविण्याचा प्रयत्न करत आहे. थोडक्यात भिंती खऱ्या अर्थाने बोलू लागल्या आहेत.

        गेल्या काही महिन्यांपासून ठाणे शहरातील रस्त्यावरील भिंती असो या उड्डाणपूल यांची रंगरंगोटी केल्याने शहर विविध रंगांनी नाहून गेले आहे. वन्य जीवच नाहीतर वृक्षवल्ली असो या सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार मंडळींचे छायाचित्र आदी रेखाटून निर्जीव भिंतींमध्ये जीव ओतल्याचे दिसून आले. शहर सौंदर्यीकरणातून हे कामे केली जात आहेत. याचदरम्यान महापालिकेने शहरातील महत्वाची असलेले चौक त्यामध्ये तीन हात नाका, माजीवडा, कॅडबरी यासारख्या १४ चौकात विशिष्ट आकारांच्या भिंती उभारणी करून त्यांच्यावर महाराष्ट्रातील संतमंडळी तसेच मराठी भाषेत आपली आगळीवेगळी छाप उमठवणारे कवीमंडळींच्या कवितांमधील ओवी थेट मनाला स्पर्श करील असे अलंकारिक शब्दरचनांबरोबर बोलके चित्रही काढून तो चौक बोलके केले आहेत. यामध्ये संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या ज्ञानेश्वरीतील  "दुरितांचे तिमिर जावो ।| विश्व स्वधर्म सूर्ये पाहो । जो जे वांछील तो ते लाहो। प्राणिजात ॥" हा अभंगच नाही, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या चित्रबरोबर वारीला निघाले वारकरीही पाहण्यास मिळत आहेत. तर थोर समाजसुधारक महात्मा फुले यांचे  विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।। अशाप्रकारे शिक्षणाचे महत्व सांगितले. ते एका पाटीवर मांडण्यात आले आहे.

गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार अन् वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार असे कुसुमाग्रज यांचे काव्य महाराष्ट्राचा नकाशा काढून दाखविण्यात आला आहे. याशिवाय बहिणाबाई चौधरी यांचे मानसा मानसा कधी व्हशील मानूस लोभासाठी झाला मानसाचारे कानूस असे माणसाला भिडणारे शब्द चौकात भिडताना दिसत आहे. कसे प्रेम करावे, हे कवितेतून मंगेश पाडगावकर यांचे "या ओठानी चुंबून घेईन हजारदा ही माती अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी इथल्या पिंपळ पानांवरती अवघे विश्व तरावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे." काव्य खऱ्या अर्थाने अंर्तभाव दाखवत आहे. तसेच हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणाच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती. असे बालकवी यांचे काव्याने थेट फुलराणीला ठाण्यात प्रत्येकासाठी उतरवले आहे असाच भास होत आहे.    महापालिकेच्या या उपक्रमाची खऱ्या अर्थाने चर्चा होऊ लागली आहे. जाता येता महाराष्ट्रातील संत, समाजसुधारक, कवी यांच्या कवितांमधील त्या ओळी मनाला स्पर्श करणारा धकवा नायसा करते तसेच मराठी भाषा किती मधुर आणि गोड आहे हे दाखवून देत आहे.