शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

थप्पड कनिष्ठ अभियंत्याला वळ उठले सहायक आयुक्तांवर

By धीरज परब | Updated: June 27, 2023 22:53 IST

शासनाने ठाण्यात बदली करून देखील तब्बल एकवर्ष मीरा भाईंदर न सोडणाऱ्या सहायक आयुक्तची अखेर उचलबांगडी

मीरारोड -  आमदार गीता जैन यांनी ठेक्यावरील कनिष्ठ अभियंत्यास लागवलेल्या थप्पडचे वळ त्या भागातील प्रभाग अधिकारी असलेल्या सचिन बच्छाव यांच्यावर उठले आहेत . बच्छाव यांची शासनाने गेल्यावर्षी ठाणे महापालिकेत बदली केली असताना बच्छाव गेलेच नव्हते . आ . जैन यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना भेटून तक्रार केल्यावर सूत्रे हल्ली आणि मंगळवारी बच्छाव हे मीरा भाईंदर महानगरपालिका सोडून ठाणे महापालिकेत हजर झाले

मीरारोडच्या पेणकरपाडा भागात पावसाळ्यात राहते घर तोडण्याची कारवाई प्रभाग अधिकारी बच्छाव यांनीच बिल्डरच्या तक्रारी वरून केली होती . २० जून रोजी आ . गीता जैन घटनास्थळी गेल्या असता बच्छाव मात्र गेले नव्हते . त्यांनी ठेक्यावरील कनिष्ठ अभियंता शुभम पाटील व संजय सोनी यांना पाठवले होते . 

आ . जैन यांनी शुभम यांना थप्पड लगावल्याच्या घटनेने खळबळ उडाली . मात्र त्यांचा खरा रोष हा बच्छाव यांच्यावर होता . आणि तश्या घडामोडी देखील बच्छाव यांच्या कडून घडल्याचे सांगितले जाते . वास्तविक शासनाने बच्छाव योनीची बदली ठाणे महापालिकेत  २२ मे २०२२ रोजीच शासन आदेश काढून केली होती. मात्र त्या नंतर देखील बच्छाव हे मीरा भाईंदर महापालिका सोडत नव्हते . 

थप्पड प्रकारा नंतर आक्रमक झालेल्या आ . जैन यांनी सोमवारी राज्याचे मुख्य सचिव  मनोज सौनिक यांना भेटून बच्छाव यांची तक्रार केली . शासन आदेशाचे उल्लंघन करून बदलीच्या ठिकाणी तब्बल एक वर्ष पेक्षा जास्त काळ होऊन देखील हजर न झालेल्या बच्छाव यांना निलंबित करा आणि विभागीय चौकशी करा अशी मागणी त्यांनी केली . मुख्य सचिवांनी देखील सदर बाब गंभीर असल्याने तात्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले . त्यानंतर बच्छाव यांनी मीरा भाईंदर महापालिका सोडत ठाणे पालिकेत मंगळवारी रुजू झाले .