शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

उत्तनच्या खोपरा गावचा रस्ता विकसित करण्याचा प्रस्ताव अखेर शासनाच्या कोर्टात 

By धीरज परब | Updated: May 23, 2023 14:37 IST

गेल्या काही वर्षात या भागात काही बडे राजकारणी, व्यावसायिक आदींनी रस्ता नसल्याने कवडीमोलाने जमिनी विकत घेतल्या आहेत.

मीरा रोड - भाईंदर पश्चिमेस डोंगरी - उत्तन भागातील खोपरा गावात जाण्याचा रस्ता विकसित करण्याचा प्रस्ताव अखेर फेरबदल करून महापालिकेने राज्य शासना कडे मंजुरी साठी पाठवला आहे.

डोंगरीच्या पोलीस चौकी कडून पुढे खोपरा गाव कडे जाणारा रस्ता हा विकास आराखड्यात असला तरी तो काही भागात डोंगरातून जातो. शिवाय येथे मोठी लोकवस्ती नाही. पालिके कडे निधीची कमतरता, मतदारांची नाममात्र संख्या, काही जमीन मालकांची, सीआरझेड आदी विविध  कारणांनी हा रस्ता विकसित झाला नाही. 

जेणे करून येथील रहिवासी कच्च्या रस्त्याचाच वापर नाईलाजाने करत आले आहेत. रस्ता कच्चा आणि वाईट अवस्थेत असल्याने पावसाळ्यात तर लोकांचे अतिशय हाल होतात.  कोणी आजारी पडल्यास रुग्णवाहिका जायला तयार होत नाही. मृत्यू झाल्यास देखील स्मशानभूमीत नेण्यासाठी शववाहिनी येत नाही. पावसाळ्यात तर चिखलातून ये जा करावी लागते. सुमारे तीन किलोमीटर पायपीट करत मुख्य रस्त्यावर बस - रिक्षासाठी यावे लागते. विद्यार्थी, वृद्ध , महिला आदींना त्रास जास्त सहन करावा लागतो.

गेल्या काही वर्षात या भागात काही बडे राजकारणी, व्यावसायिक आदींनी रस्ता नसल्याने कवडीमोलाने जमिनी विकत घेतल्या आहेत. तर रस्ता व्हावा म्हणून स्थानिकांसह तत्कालीन नगरसेवक , राजकारणी आदी रस्त्याची मागणी करत आले आहेत. पक्का रस्ता नसल्याने सार्वजनिक दिवाबत्ती, पाणी पुरवठा आदी सुविधा देखील पालिका देत नाही. वास्तविक सुविधा उपलब्ध करून देणे महापालिकेचे कर्तव्य आहे. मंजूर विकास आराखड्यातला रस्ता हा डोंगरातून जात असल्याने तो विकसित करण्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे  सद्या अस्तित्वात असलेला रस्ताच विकास आराखड्यात दाखवून तो विकसित करण्याचा निर्णय ठरावा द्वारे केला आहे.

तो ठराव मंजुरीसाठी शासनाकडे सादर करून देखील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. आमदार गीता जैन यांनी शासना कडे रस्ता मंजूर करून विकसित करण्यासाठी पाठपुरावा चालवला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या  बैठकीत रस्त्याच्या फेरबदलासाठी जागामालकांची सुनावणी घेऊन तसेच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून प्रस्ताव पुन्हा शासनाकडे अंतिम मान्यतेसाठी सादर करावा, असे निर्देश महापालिकेला देण्यात आले होते.

मात्र त्या कार्यवाहीस देखील विलंब होत असल्याने आ. जैन तसेच स्थानिकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. आयुक्त दिलीप ढोले यांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिल्या नंतर आता पालिकेने आवश्यक कार्यवाही पूर्ण केली आहे. पालिकेने शासनाला सुधारित प्रस्ताव सादर  केला असून आता शासनाच्या मंजुरीवर रस्त्याचे भवितव्य अवलंबून आहे.