शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

गणेश विसजर्नासाठी पोलीस यंत्रणोसह पालिकेची यंत्रणा सज्ज

By अजित मांडके | Updated: September 8, 2022 14:02 IST

दीड आणि सहा दिवसांच्या बाप्पांना निरोप दिल्यानंतर आता दहा दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यासाठी ठाण्यासह जिल्हा सज्ज झाला आहे.

ठाणे :

दीड आणि सहा दिवसांच्या बाप्पांना निरोप दिल्यानंतर आता दहा दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यासाठी ठाण्यासह जिल्हा सज्ज झाला आहे. मनोभावे पूजाअर्चा केल्यानंतर शुक्र वारी अनंत चतुर्थीला जिल्ह्यात विविध ठिकाणी बाप्पांना निरोप दिला जाणार आहे. परंतु या दिवशी कोणत्याही स्वरुपाचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांबरोबरच पोलीस यंत्रणा देखील सज्ज झाली आहे. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच शीघ्रकृती दल आणि एसआरपीएफच्या तुकडय़ा देखील ठिकठिकाणी सज्ज ठेवण्यात येणार आहे. तर जिल्ह्यात ७४८ सार्वजनिक आणि ३४ हजार ६२३ घरगुती बाप्पांना निरोप दिला जाणार आहे.यंदा ठाणे शहरात गणेश मुर्तींच्या विसर्जनामुळे तलावांचे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने मासुंदा तलाव, खारेगाव तलाव, न्यू शिवाजी नगर, ऋतू पार्क, खिडकाळी तलाव, दातीवली तलाव, वागळे इस्टेट परिसरातील रायलादेवी तलाव नं.१, रायलादेवी तलाव नं.२, उपवन येथे पालायदेवी मंदिर, आंबेघोसाळे तलाव, निळकंठ वुडस् उपवन तलाव, बाळकुम रेवाळे आणि कावेसर (हिरानंदानी) या ठिकाणी कृत्रीम तलाव निर्माण करण्यात आले आहे. तसेच गणेश मुर्तींचे विधिवत वाहत्या पाण्यात विसर्जन व्हावे यादृष्टीकोनातून महापालिकेच्यावतीने पारसिक रेतीबंदर, कोलशेत, कोपरी(चेंदणी कोळीवाडा) कळवा पूल(निसर्ग उद्यान), कळवा(ठाणे बाजू), बाळकूम घाट आणि दिवा घाट असे एकूण ७ विसर्जन घाट तयार करण्यात आले आहेत.९ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थीला ठाणे पोलीस आयुक्तालयातील ७४८ सार्वजनिक तर,३४ हजार ६२३ घरगुती बाप्पांना भावपूर्ण वातवरणात निरोप देण्यात येणार आहे. यावेळी कुठलही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौज फाटा देखील तैनात ठेवण्यात येणार आहे. तसेच विसर्जन मार्गात वाहतूक कोंडी होवू नये यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आले आहे.  गणेशोत्सवामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणे पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवली आहे. तसेच संपूर्ण पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे.

टॅग्स :thaneठाणे