शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या वाढतेय; मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिम

By अजित मांडके | Updated: November 9, 2022 19:04 IST

बेघर व भटक्या व विमुक्त जमातीतील मतदारांची नोंदणी, १० नोव्हेंबर रोजी ग्रामसभा आयोजित करुन मतदार यादीचे वाचन केले जाणार,

ठाणे  : भारत निवडणुक आयोगाच्या सुचनेनुसार ठाणे  जिल्ह्यातही आता नव मतदार नोंदणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यानुसार ३० सप्टेंबर २०२३ र्पयत ज्यांचे वय १८ वर्षे पूर्ण होणार आहेत. अशा मतदारांनी ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ या कालावधीत आयोजित मतदारयादीच्या विशेष संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रमादरम्यान आगाऊ मतदार नोंदणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली. तर ठाणो जिल्ह्यात सध्या ६१ लाख ३४ हजार ९५५ मतदारांची नोंद झाली असून त्यात पुरुष मतदारांची संख्या ३३ लाख २८ हजार ९ एवढी असून २८ लाख ६ हजार ९३  स्त्री मतदारांची नोंद झाली असून महिला मतदारांची संख्या वाढत आहे. तर संपूर्ण राज्यात ठाणो जिल्ह्यात सर्वाधिक ८५३ तृतीय पंथी मतदारांची नोंद झाली आहे. तसेच जिल्ह्यात ६ हजार ३९१ मतदान केंद्रे झाली असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

या पुनरिक्षण कार्यक्रम ९ नोव्हेंबर पासून सुरु होणार असून दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी ९ ते ८ डिसेंबर २०२२ असा आहे. विशेष मोहीम कालावधी ११ नोव्हेंबर २० नोव्हेंबर, ३ डिसेंबर आणि ४ डिसेंबर असा आहे. दावे हरकती निकालात काढण्याचा कालावधी २६ डिसेंबर र्पयत असणार आहे. अंतिम प्रसिध्दीसाठी आयोगाची परवानगी ३ जानेवारी २०२३ र्पयत असणार असून मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करणो ५ जानेवारी २०२३ ही असणार आहे. दुसरीकडे ठाणो जिल्ह्यात ३१ हजार ८७ दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली आहे. ठाणो जिल्ह्यात मतदारयादी विषयक काम करणारे मतदान केंद्र स्तरीय अधिकारी ५ हजार ५६९ कार्यरत आहेत. तर मतदार यादीत १०० टक्के मतदारांची छायाचित्रे असल्याचा दावा करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात काही महत्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रीतमहिला मतदारांची नोंदणी - भिवंडी, पूर्व आणि पश्चिम, ऐरोली, बेलापुर या विधानसभा क्षेत्रत विशेष शिबिरांचे आयोजन केले जाणार. यासाठी महिला बचत गट, अंगणवाडी सेविकांची मदत घेतली जाणार. ग्रामीण भागातील भिवंडी ग्रामीण, मुरबाड आदी ठिकाणी देखील विशेष शिबिर घेतले जाणार आहे.

युवा मतदारांची नोंदणी - जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार संघात १८ नोव्हेंबर रोजी ठाणो येथील बेडेकर कॉलेजमध्ये अशी होते मतदार नोंदणी या शिर्षकाखाली विद्याथ्र्याचा परिवसंवाद आयोजित केला जाणार.

बेघर व भटक्या व विमुक्त जमातीतील मतदारांची नोंदणी, १० नोव्हेंबर रोजी ग्रामसभा आयोजित करुन मतदार यादीचे वाचन केले जाणार, शहरी भागांसाठी मतदार नोंदणीमध्ये विशेष उपाय योजना केल्या जाणार, मतदार यादीतील तपशीलासोबत आधार क्रमांकाची जोडणी, राजकीय पक्षांचा सहभाग घेतला जाणार, मात्र २०२३ पासून जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर या महिन्याच्या एक तारखेला किंवा त्या आधी ज्या नागरीकांची १८ वर्षे पूर्ण होतील त्यांना ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ या विशेष मोहीमेत आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे.

टॅग्स :Votingमतदान