शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात स्वाईन फ्लुच्या रुग्णांची संख्या वाढतेय

By अजित मांडके | Updated: July 11, 2024 15:12 IST

पावसाळा सुरु होताच आरोग्य यंत्रणा देखील साथरोगांचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे. परंतु असे असले तरी देखील जुन आणि जुलै महिन्यात स्वाईन फ्लु आणि डायरेरियाच्या रुग्णांची संख्या वाढतांना दिसत आहे.

ठाणे : पावसाळा सुरु झाला आणि ठाण्यात साथरोगाच्या आजारांच्या रुग्णांची संख्या देखील वाढू लागल्याचे चित्र आहे. त्यातही मागील वर्षीच्या तुलनेत यंदा स्वाईन फ्लुच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आकेडवारीवरुनच स्पष्ट होत आहे. तसेच डायरेरीया आणि लेप्टोच्या रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. ठाण्यात जुलै महिन्यात स्वाईन फ्लुचे तब्बल ७० रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहेत. तर डायरेरीयाचे याच महिन्यात ११७ रुग्ण आढळून आले आहेत. त्या खालोखाल लेप्टोचे २० रुग्ण आढळले आहेत. याशिवाय शहरात मलेरिया आणि डेंग्युच्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यु, मलेरियाचे रुग्ण कमी आढळून आल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

पावसाळा सुरु होताच आरोग्य यंत्रणा देखील साथरोगांचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे. परंतु असे असले तरी देखील जुन आणि जुलै महिन्यात स्वाईन फ्लु आणि डायरेरियाच्या रुग्णांची संख्या वाढतांना दिसत आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने आरोग्य केंद्राच्या मार्फत खरबरदारी घेतली असली तरी देखील आता प्रत्येक आरोग्य केंद्रात सर्दी, ताप, खोकला आदीच्या रुग्णांची संख्या देखील वाढत असल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या छपत्रती शिवाजी महाराज रुग्णालयात देखील याच आजाराचे रुग्ण अधिक संख्येने वाढत असल्याचे दिसत आहे.

स्वाईन फ्लुच्या रुग्णात वाढठाणे महापालिका हद्दीत सध्या स्वाईन फ्लुच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतांना दिसत आहे. जुलै महिन्यात १० दिवसातच रुग्णांची संख्या ७० च्या पार गेली आहे. तर जुन महिन्यात ८ रुग्ण आढळले होते. तर जानेवारी ते जुलै या कालावधीत या रुग्णांची संख्या ११५ एवढी आढळून आली आहे. सुदैवाने यात कोणचाही मृत्यु झाला नसल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले. मागील वर्षभरात या आजाराचे २५६ रुग्ण आढळून आले होते. तर संपूर्ण पावसाळ्याच्या कालावधीत ही संख्या ८७ एवढी होती. परंतु यंदा मात्र अवघ्या १० दिवसात रुग्णांची संख्या ७० पार गेली आहे.

डायरेरियाच्या रुग्णही वाढलेमहापालिका हद्दीत जानेवारी ते जुलै या कालावधीत ८८६ रुग्ण आढळून आले आहे. जुलैच्या पहिल्या १० दिवसात ११७ तर जून महिन्यात २१२ रुग्ण आढळून आले आहेत. तर प्रत्येक महिन्यात या आजाराच्या रुग्णांची संख्या वाढतांना दिसत आहे.

लेप्टाचे २० रुग्णलेप्टोच्या आजाराने देखील महापालिका हद्दीत दस्तक दिली असून मागील १० दिवसात लेप्टोचे २० रुग्ण आढळून आले आहेत. तर जानेवारी ते जुलै या कालावधीत ही संख्या २७ एवढी असून पाच महिन्यात ०७ रुग्ण तर जुलैच्या अवघ्या १० दिवसात २० रुग्ण आढळले आहेत.

मलेरिया, डेंग्युच्या रुग्णांची संख्या घटलीमागील वर्षीच्या तुलनेत सध्या तरी मलेरिया आणि डेंग्युच्या रुग्णांची संख्या घटल्याचे चित्र आहे. जुलैच्या १० दिवसात मलेरियाचे ११ तर डेंग्युचे संशयीत १५ आणि लागण झालेले ३ असे १८ रुग्ण आढळले आहेत. तर जानेवारी ते जुलै या कालावधीत मलेरियाचे ११८ तर डेंग्युचे संशयीत ९६ तर लागण झालेले ४४ असे १३६ रुग्ण आढळले आहेत. मागील वर्षी डेंग्युचे वर्षभरात ५५६ रुग्ण आढळले होते. तर ०३ जणांचा मृत्यु झाला होता. तर मलेरियाचे ८९३ रुग्ण आढळून आले होते.

आजारजानेवारी ते जुलै१) स्वाईन फ्लु - ११५२) डायरेरिया - ८८६३)लेप्टो - २७४) मलेरिया - ११८५) डेंग्यु - १३६

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लूthaneठाणे