शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

मीरारोडच्या शांती नगरमधील फेरीवाल्यांचा पालिका पथकावर हल्ले सुरूच

By धीरज परब | Updated: January 6, 2024 18:22 IST

मीरारोड - मीरारोडच्या शांती नगर मधील फेरीवाल्यांनी मीरा भाईंदर महापालिकेच्या पथकावर हल्ले सुरूच ठेवले असून ४ जानेवारीच्या रात्री १७ ...

मीरारोड - मीरारोडच्या शांती नगर मधील फेरीवाल्यांनी मीरा भाईंदर महापालिकेच्या पथकावर हल्ले सुरूच ठेवले असून ४ जानेवारीच्या रात्री १७ फेरीवाल्यांवर नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फेरीवाल्यांचे पालिका पथकावर होणारे हल्ले म्हणजे गुंडगिरी असून त्यांच्या विरोधात पालिकेसह पोलिसांनी देखील कठोर कारवाई करावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे. 

मीरारोडच्या शांती नगर मधील फेरीवाल्यांनी एका वृद्ध दुकानदारास दुचाकी उभी करण्यावरून केलेल्या मारहाणी नंतर स्थानिक दुकानदार व नागरिकां मधील फेरीवाल्यांच्या जाचा बद्दलचा संताप उफाळून आला. तेव्हापासून आजी माजी आमदार, माजी नगरसेवक आदींनी देखील ह्या फेरीवाल्यांवर कठोर कारवाईची मागणी चालवली आहे. 

शांती नगर मधील फेरीवाल्यांच्या जाचा बद्दल स्थानिक नागरिकांनी सातत्याने तक्रारी केल्या आहेत. आंदोलने देखील झाली आहेत. परंतु ह्यातून चालणारे मोठे अर्थपूर्ण कारणामुळे फेरीवाल्यांवर ठोस कारवाई होत नव्हती. पण दुकानदारास मारहाणीच्या घटनेनंतर नागरिक, व्यापारी, आमदार व राजकारणी आदींनी कारवाईची आग्रही मागणी केल्याने पालिका नियमित कारवाई करू लागली आहे. 

महापालिकेवर विविध स्वरूपाचे आरोप करणाऱ्या फेरीवाल्यांनी आपले धंदे लावण्यास सुरवात केली असता तक्रारी होऊन महापालिका सुद्धा प्रतिबंधात्मक परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी थोडेफार प्रयत्न करू लागली आहे . त्यातूनच ३ जानेवारी रोजी कारवाईसाठी आलेल्या  प्रभाग अधिकारी स्वप्नील सावंत सह पालिका कर्मचाऱ्यांवर फेरीवाल्यांनी हल्ला चढवला . सरकारी कामात अडथळा आणला. त्या रात्री नया नगर पोलिसांनी अंकित जयस्वाल, महेश जयस्वाल, सुनील रामदास ठक्कर, आयेशा सय्यद, समीर शेख, मुन्वर मिरझा ह्या ६ जणांवर सरकारी एकमत अडथळा आणण्यासह अन्य कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. 

४ जानेवारी रोजी देखील अतिक्रमण विभाग प्रमुख नरेंद्र चव्हाण सह पालिका पथकावर फेरीवाल्यांनी हल्ला चढवला. तेथील रुपाली साडी सेंटर जवळ फेरीवाल्यांनी अनधिकृत रित्या जमाव गोळा करून चव्हाण यांच्या सह संबंधित अधिकारी - कर्मचारी यांना विरोध केला. फेरीवाल्यांनी कारवाई बंद पडून अधिकारी - कर्मचारी यांना धक्काबुक्की केली. शासकीय कामात अडथळा आणला.गणेश दीनानाथ यादव, अंकित जयस्वाल, महेश जयस्वाल, सुनील रामदास ठक्कर, आयेशा सय्यद, समीर शेख, मुनावर मिरझा ह्या ७ जणांवर व अन्य १० फेरीवाल्यांवर सरकारी एकमत अडथळा आणण्यासह अन्य कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करत आहेत.