शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

अनाथाश्रमातील मुलीला मिळाला ‘एमबीबीएस’ला प्रवेश; राजेश नार्वेकर यांनी केले कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2022 20:46 IST

चार वर्षांची असल्यापासून बदलापूर येथील बॉम्बे टीन चँलेंज येथे शबाना शेख ही राहत होती.

ठाणे- अनाथ प्रमाणपत्राचा लाभ घेऊन औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश मिळविलेल्या शबाना शेख हिचे आज जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच पुढील काळात कोणतीही अडचण आल्यास आपण तुझ्यासोबत आहोत, अशा आश्वासक शब्दांत तिचे मनोधैर्य वाढविले. 

चार वर्षांची असल्यापासून बदलापूर येथील बॉम्बे टीन चँलेंज येथे शबाना शेख ही राहत होती. तिचे पालक नसल्यामुळे संस्थेत राहून तिने शिक्षण पूर्ण केले. महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने कु. शबाना हिस अनाथ प्रमाणपत्र देण्यात आले होते. कु. शबाना हिने कष्टाने इयत्ता बारावीची परीक्षा दिली व त्यात यश मिळविले. त्यानंतर तिने वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आवश्यक असणारी ‘निट’ची परीक्षाही पास झाली. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी तिने अनाथ कोट्यातून अर्ज केला होता. तिला औरंगाबादच्या शासकीय महाविद्यालयात ‘एमबीबीएस’च्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला. 

तिच्या या यशाचे कौतुक करण्यासाठी जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात एक छोटेखानी सत्कार समारंभ आयोजित केला होता. यावेळी जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी कु. शबाना हिस पुष्पगुच्छ देऊन व पेढा भरवून शुभेच्छा दिल्या. 

नार्वेकर म्हणाले की, औरंगाबाद येथील शिक्षण काळात काहीही मदत लागल्यास हक्काने सांग आम्ही तुला मदत करू. तुझ्या शिक्षणाचा फायदा समाजासाठी होईल, असे ध्येय ठेव. अंबरनाथमध्ये डॉक्टरांची गरज आहे. शिक्षणानंतर तेथे सेवा देण्याचा विचार कर, असे ही त्यांनी सांगितले.  यावेळी जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी महेंद्र गायकवाड, जिल्हा बालकल्याण कक्षाच्या सामाजिक कार्यकर्त्या रोहिणी शिरसाट, बॉम्बे टीन चँलेंज संस्थेच्या अधिक्षिका पद्मजा गुडे, बालसंरक्षण अधिकारी पल्लवी जाधव आदी यावेळी उपस्थित होते. 

टॅग्स :thaneठाणे