शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

मत्स्य विभागाने दिले कोस्टगार्डला कर्नाटकच्या घुसखोर तसेच एलईडी व पर्ससीन मासेमारी बोटींवर कारवाईचे पत्र

By धीरज परब | Updated: March 25, 2023 19:07 IST

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, उपनगर, ठाणे, पालघर ह्या सर्व जिल्ह्यांमध्ये पर्ससीन व एलईडी पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बोटींना डिसेंबर ते मे महिन्यात बंदी असताना १२ नोटीकल च्या आतील क्षेत्रात ते बेकायदेशीर मासेमारी करतात. 

मीरारोड - अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या मागणी नंतर मत्स्य व्यवसाय विभागाचे आयुक्त यांनी कोस्टगार्ड ला पत्र पाठवून बेकायदा मासेमारी करणाऱ्या एलईडी व पर्ससीनसह कर्नाटकच्या घुसखोर बोटींवर  कारवाई करण्यासाठी सहकार्य मागितले आहे. 

अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र तांडेल,  कार्याध्यक्ष बर्नड डिमेलो,  सचिव संजय कोळी,  सिंधुदुर्ग अध्यक्ष  मिथुन मालंडकर रत्नागिरी अध्यक्ष खलील वस्ता व इतर पदाधिकारी  आदींनी कोकण किनारपट्टी वरील मच्छीमार बंदरांचा दौरा केला होता. 

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, उपनगर, ठाणे, पालघर ह्या सर्व जिल्ह्यांमध्ये पर्ससीन व एलईडी पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बोटींना डिसेंबर ते मे महिन्यात बंदी असताना १२ नोटीकल च्या आतील क्षेत्रात ते बेकायदेशीर मासेमारी करतात. 

इतकेच नव्हे तर बेकायदा मासेमारी करणारे हे बोटवाले स्थानिक छोट्या व पारंपारिक मच्छीमारांना मात्र दादागिरी करून मासेमारी करण्यास मज्जाव करीत आहेत . शिवाय कर्नाटक राज्यातील मोठमोठ्या बोटी घोळक्याने महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग हद्दीत येऊन बेकायदा मासेमारी करत आहेत.

त्या बाबतच्या तक्रारी कृती समितीने मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे यांच्या कडे सातत्याने चालवल्या होत्या .  त्यानंतर काही प्रमाणात कारवाईला सुरवात झाली . मात्र मत्स्य  विभागाकडे कारवाई करण्यास पुरेशी यंत्रणा नसल्याने अडचण होत असल्याचे सातत्याने सांगण्यात येत होते. 

कृती समिती ने अनधिकृत मासेमारीवर नियंत्रण आणि त्यांची गुंडगिरी मोडून काढण्यासाठी नौदल किंवा कोस्ट गार्ड यांची मदत घेऊन कारवाई करा अशी मागणी पाटणे यांच्या कडे केली होती . त्या नुसार आयुक्त पाटणे यांनी कृती समितीची मागणी मान्य करत कॉस्टगार्डला लेखी पत्र देऊन अनधिकृत मासेमारी करणाऱ्यांवर कारवाई करण्यास मत्स्य विभागास सहकार्य करण्यास सांगितले आहे अशी माहिती बर्नड डिमेलो यांनी दिली. 

टॅग्स :mira roadमीरा रोड